Video : रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबविला स्वतःचा ताफा, रस्ता दिला मोकळा करून - हिमाचल पंतप्रधान नरेंद्र मोदी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 10, 2022, 3:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

कांगडा (हिमाचल प्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी त्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला pm stopped his convoy थांबवला. रुग्णवाहिका पार केल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकला. पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावर अचानक थांबताच हिमाचल पोलीस आणि इतर गुप्तचर यंत्रणांमध्ये घबराट पसरली. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील कांगडा येथील चंबी मैदानावर भाजप उमेदवाराच्या बाजूने निवडणूक रॅली घेऊन पंतप्रधान मोदी गग्गल विमानतळावर परतत PM modi himachal rally होते. गग्गल विमानतळावरून पंतप्रधान हमीरपूरमधील सुजानपूर येथे आयोजित त्यांच्या दुसऱ्या सभेला पोहोचणार होते. मोदींचा ताफा विमानतळापासून काही अंतरावर असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. यावर पीएम मोदींनी तात्काळ त्यांचा ताफा थांबवला आणि आधी रुग्णवाहिका बाहेर काढा, असे सांगितले. रुग्णवाहिका निघून गेल्यानंतर मोदींचा ताफा गग्गल विमानतळावर पोहोचला, तेथून त्यांनी सुजानपूर रॅलीसाठी प्रस्थान केले. Himchal PM Narendra Modi
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.