Nitin Gadkari on Political Career : राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या - नितीन गडकरी - political career Nitin Gadkari
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - सक्रिय राजकारणात राहून समाजकारण करणे हाच धर्म माणणाऱ्यांपैकी ( Nitin Gadkari comment on quitting political career ) एक व्यक्तिमत्त्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती बघता केव्हा राजकारण सोडतो, असे वाटायला लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले , त्यानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सत्कार करताना ते बोलत होते. मी गिरीष गांधींना म्हणायचो राजकारण करू नका, मला खूप वेळा वाटते केव्हा सोडायचे केव्हा नाही. राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या आहेत, असे गडकरी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST