Heavy Rain in Mumbai at Night : मुंबईत रात्री मुसळधार पाऊस; मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी - दहिसर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : मुंबईत रात्री मुसळधार पाऊस ( Heavy Rain in Mumbai at Night ) ( orange alert ) झाला. ढग गडद झाले होते. कालच हवामान खात्याने (IMD) मुंबईत पुढील 3 दिवस जोरदार पावसाची ( 3 to 4 days Heavy Rain in Mumbai ) शक्यता वर्तवली होती. त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई महापालिकादेखील सज्ज झाली. राज्यातील काही ठिकाणी एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील वांद्रे, दादर, माहिम, मुंबई, सेंट्रल चर्चगेट, दहिसर, बोरिवली या भागांत काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्रीसुद्धा पावसाचा जोर सुरूच होता. काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागांत पाऊस कोसळत आहे. दक्षिण मुंबईत तर पावसाने जोरदार हजेरी लावली. तर इतर भागात सध्या ढगाळ वातावरण असून अजूनही काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत आहे. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत तर अगदी पहाटेपासून पाऊस सुरु आहे. मुंबईतील चुनाभट्टी, दादर, लालबाग परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST