VIDEO ऐतिहासिक शनिवार वाड्यावर मध्यरात्री फडकला तिरंगा - शनिवार वाड्यावर मध्यरात्री फडकला तिरंगा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा १४ ऑगस्टच्या रात्री बारा वाजता Flag hoisted in Shaniwar Wada at midnight देशभरात अभिमानाने तिरंगा फडकला होता. त्याचप्रकारे सर्व पुणेकरांच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने पुण्याच्या ऐतिहासिक अशा शनिवार वाडा येथे मध्यरात्री हजारो पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा फडकवण्यात आला. मध्यरात्री ध्वजारोहणाचा हा क्षण पाहण्यासाठी हजारो पुणेकरांची गर्दी शनिवार वाडा Shaniwar Wada pune news येथे जमली होती. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते रात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. शनिवार वाड्याच्या साक्षीने मध्यरात्री तिरंगा उंचच उंच फडकत असताना प्रत्येकाचे हात सलामीसाठी उंचावले आणि 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' या घोषणांनी शनिवार वाडा दुमदुमन गेला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST