Hisab Issue : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - मुस्लिम धर्मगुरू वसीम पिरजादा
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - हिजाब हा मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही. तो शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब अनिवार्य नाही, असे कर्नाटक न्यायालयाने म्हटले आहे. ( Karnataka High Court on Hijab ) हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आपला हा निर्णय दिला असून यावर मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप घेतला आहे, या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती मुस्लिम धर्मगुरू सैय्यद मोसीम पिरजादा यांनी दिली आहे. ( Nashik Muslim Dharmaguru ) बुरखा आणि हिजाब हा वेगळा विषय आहे. ( Nashik Muslim Dharmaguru on Hijab ) याबाबत मुस्लिम धर्मियांच्या कुराणात भाग नंबर 18 आणि 22 मध्ये हिजाबबाबत महिलांनी घराबाहेर पडतांना डोक्यावर पदर घ्यावा, याबाबत नोंदी असल्याचंही ते म्हणाले. ईटीव्ही भारतसोबत त्यांनी बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST