Raj Thackeray : सोलापुरातील मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यास दिला पाठिंबा - Azaan Loudspeaker Issue
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14957045-124-14957045-1649341302640.jpg)
सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबई येथे भाषण केले. या भाषणात त्यांनी सांगितले की, मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा त्या भोंग्या समोर त्यापेक्षा दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसा लावली जाईल. यावरून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला जातीचे वळण लागले जात असल्याची भीती अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले ( Azaan Loudspeaker Issue ) आहे. राज ठाकरेंच्या या भाषणाला सोलापुरातील मुस्लिम मन सैनिकांनी पाठिंबा दिला ( Muslim activists in Solapur support raj thackeray statement ) आहे. आणि राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समर्थन केले आहे. मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे केलेल्या भाषणा बाबत बोलताना, सोलापुरातील मनसे शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी कायद्याची भाषा बोलली आहे. मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनिप्रदूषण होतो. यापूर्वी न्यायालयाने देखील अनेक वेळा निर्णय दिला आहे. आणि महाराष्ट्रात कोर्टाच्या आदेशाची पायमली होत आहे हे निदर्शनास, आणून देण्याचा प्रयत्न केला आहे असे शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST