MLA Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधवांनी देहभान विसरून नाचवली ग्रामदेवतेची पालखी.. - ग्रामदेवतेची पालखी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14769065-870-14769065-1647610449655.jpg)
रत्नागिरी : दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव ( Shimga Festival Konkan ) मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव ( Shivsena MLA Bhaskar Jadhav ) हेदेखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. आजदेखील गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST