Kolhapur by-election : चंद्रकांत दादांनी भाजपच्या 'त्या' तिघांवर आता ईडी लावावी - पालकमंत्री सतेज पाटील - सतेज पाटील टीका चंद्रकांत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - भाजपला जनाधार नसल्याने त्यांनी पैसे वाटले. त्यामुळे, जनता त्यांना योग्य उत्तर ( Kolhapur by-election ) देईल. भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप पैसे घेऊन मते घेते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Satej Patil comment on Chandrakant patil ) यांनी पैसे वाटणाऱ्या त्या तिघांवर ईडी लावावी, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले. शिवाय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इंधन तसेच सिलेंडर दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे, लोक मतदानाच्या रुपात भाजपला उत्तर देतील, असेही सतेज पाटील म्हणाले. सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST