धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला... - Taliparamba Iritti State Highway
🎬 Watch Now: Feature Video

कन्नूर (केरळ) - कन्नूर जिल्ह्यातील तळीपारंबा इरिट्टी राज्य महामार्गावर ( Taliparamba Iritti State Highway ) एक आठ वर्षाचा चिमुरडा केवळ दैव बलवत्तर म्हणून बसखाली चिरडता चिरडता थोडक्यात बचावला आहे. शादुलरहमान, असे त्या चिमुरड्याचे नाव आहे. नवीन सायकल घेतल्याने तो घराच्या आवारात सायकल खेळत होता. त्यावेळी तो चुकून मुख्य रस्त्यावर गेला आणि धावत्या दुचाकीला धडकला. यामुळे तो सायकल खाली पडली व तो सायकलीवरुन खाली कोसळून फरफडत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. ज्या दुचाकीला धडकला त्या दुचाकीच्या मागे भरधाव बस होती. काही समजण्याच्या आत बस सायकलीवरुन गेली. यात सायकलीचा चेंदामेंदा झाला आहे. पण, रस्त्याच्या अवघ्या काही अंतरावर शादुलरहमान फेकला गेल्याने तो थोडक्यात बचावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST