ETV Bharat / sukhibhava

झिंक: आवश्यकता, कमतरता, फायदे आणि अन्न स्रोत

author img

By

Published : Dec 13, 2020, 12:40 PM IST

आपल्या शरीरातील अनेक क्रियांसाठी झिंक आवश्यक आहे. मात्र, जास्त झिंक घेतल्याने तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. आपल्या शरीरासाठी किती झिंक आवश्यक असते, याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.

Zinc Food Sources
झिंक अन्नस्रोत

हैदराबाद - आपले शरीर झिंक ( जस्त ) तयार करू शकत नाही, म्हणूनच या पोषक मूल्याचा पुरवठा शरीराला बाहेरून करावा लागतो. आपल्या शरीरातील अनेक क्रियांसाठी झिंक आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, जखमांवर उपचार करणे, चयापचय क्रिया वाढवणे इत्यादी. झिंक मुलाच्या योग्य वाढीसाठी मदत करते आणि प्रथिने, डीएनए संश्लेषणासाठी आपल्या शरीरात आवश्यक असते. आयुर्वेदातही जसदा भस्म किंवा झिंकची राख ही महत्त्वाची समजली जाते. विशेषकरून मधुमेहावरच्या उपचारासाठी ती वापरली जाते. आपण रोज जे पदार्थ खातो त्यात झिंक असू शकते. आपण झिंक कुठल्या कुठल्या अन्नपदार्थात मिळते ते या लेखात पुढे पाहू. –

झिंकची आपल्याला किती गरज आहे ?

आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झिंकची गरज नाही. पण सर्वसाधारणपणे रोज झिंकची गरज लागते ती पुढीलप्रमाणे -

  • ६ महिने ते १३ वर्षापर्यंतची मुले : २-८ मिग्रॅम
  • १४ ते १८ वर्ष : ९-११ मिग्रॅम
  • १८ वर्षांच्या पुढचे प्रौढ : ८-११ मिग्रॅम
  • गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रिया : ११ -१२ मिग्रॅम

वयाप्रमाणे प्रमाण वाढवावे लागते. बाळाला झिंकची किती गरज आहे हे तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञाला विचारू शकता. स्त्री आहे की पुरुष यावरही झिंकचे प्रमाण अवलंबून आहे. स्त्रीपेक्षा पुरुषाला रोज २-३ मिली ग्रॅमपेक्षा जास्त झिंकची गरज असते.

झिंकची कमतरता -

जर शरीराला झिंक आवश्यक प्रमाणात मिळाले नाही तर ते मुलांच्या वाढीवर परिणाम करते. झिंकच्या कमतरतेमुळे लैंगिक विकासाला देखील उशीर होऊ शकतो आणि पुरुषांमध्ये नपुंसकता निर्माण होऊ शकते.

झिंकच्या अभावामुळे पुढील कमतरता शरीरात दिसतात - –

  • भूक न लागणे
  • केस गळणे
  • अतिसार
  • त्वचेवर पुरळ उठणे आणि त्वचेचे इतर त्रास
  • जखम भरण्यास वेळ लागणे
  • वजन कमी होणे
  • डोळे आणि त्वचेवर फोड येणे
  • झिंकचे फायदे
  • सर्वसाधारण सर्दी

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सांगते की, अभ्यासानुसार झिंक लोझेंजेस किंवा सिरप (परंतु गोळीच्या रूपात झिंक पूरक आहार नाही) सामान्य सर्दी लवकर बरी करते. २४ तासात घेतले तर सर्दीची लक्षणेही कमी दिसू लागतात. यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.

मुरुम -

अभ्यासातून असे दिसून आले आहे की झिंक आपली त्वचा निरोगी ठेवण्यास आणि मुरुमांच्या समस्या दूर करण्यात मदत करते. तसेच आपल्या त्वचेला उष्णता आणि थंडीपासून वाचवते. त्वचेचा दाह कमी करण्यास मदत करते.

अतिसार -

५ वर्षाखालील मुलांमध्ये अतिसार हा जीवघेणा ठरतो. अभ्यासानुसार असे समोर आले आहे की झिंक पोषक आहार म्हणून घेतला तर लहान मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे कमी होतात.

रोग प्रतिकारक शक्ती -

झिंकमुळे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. चांगली रोग प्रतिकारक शक्ती असली म्हणजे शरीर संसर्गजन्य विषाणू आणि जिवाणूंशी चांगला लढा देऊ शकते.

वयाप्रमाणे होणारे मॅक्युलर डिजेनेरेशन (एएमडी) -

एएमडी हा डोळ्यांशी संबंधित आजार आहे. यात काही दिवसांनी तुमची दृष्टी जाते. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की झिंकच्या सेवनाने एएमडी आजार वाढण्याची प्रक्रिया मंदावते.

झिंकचे स्रोत -

पुढील अन्नपदार्थांमध्ये झिंक सापडते

  • मांस (गोमांस, कोकरू, डुकराचे मांस)
  • शेलफिश (ऑयस्टर, क्रॅब, क्लेम्स)
  • काजू (काजू, बदाम, शेंगदाणे)
  • बिया (भोपळा, तीळ आणि भांगेच्या बिया)
  • दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ
  • अंडी
  • किडनी बिन्स , डाळ , चणा इत्यादी
  • संपूर्ण धान्य (ओट्स, क्विनोआ, गहू)
  • भाज्या (बटाटा, काळे वाटाणे, शतावरी)
  • डार्क चॉकलेट

अति झिंकचे सेवन अपायकारक आहे का ?

जास्त झिंक घेतल्याने तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जास्त झिंकमुळे मळमळ, अतिसार, ओटीपोटात पेटके, डोकेदुखी, कमी प्रतिकारशक्ती, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे यासारख्या समस्या होतात.

म्हणूनच गरज असेल तेवढेच झिंकचे सेवन करायला हवे. तुम्हाला खात्री नसेल तर तुमच्या वयानुसार, आरोग्यानुसार किती झिंकचे सेवन करायला हवे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. शिवाय तुम्ही घेत असलेल्या औषधांमध्ये झिंक अपायकारक नाही ना तेही तपासा. शिवाय झिंक पूरक आहार म्हणून घेणे आवश्यक आहे का तेही विचारू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.