हैदराबाद : Yoga For Acidity अॅसिडीटी ही एक सामान्य समस्या असली तरी काही वेळा ही व्याधी बनते. यावर केलेल्या घरगुती उपायांनीही त्याचा परिणाम दिसायला खूप वेळ लागतो. गॅस आणि अॅसिडिटीची सर्वात मोठी कारणं म्हणजे मसालेदार आणि जास्त गोड पदार्थांचं सेवन. याशिवाय धूम्रपान, चहा आणि कॉफीमुळेही ही समस्या वाढू शकतं, त्यामुळे जर तुम्ही या समस्येनं खूप त्रस्त असाल तर काही योगासनांना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा आणि मग फरक पहा.
वज्रासन : वज्रासन हे एक असं आसन आहे जे जेवणानंतर लगेच केलं तरी कोणतीही समस्या उद्भवत नाही, उलट ते अन्न पचण्यास मदत करतं. गॅस आणि ऍसिडिटीची शक्यता देखील कमी करतं.
अर्धमत्स्येंद्रासन : हे आसन करताना पोटावर दाब पडतो, त्यामुळे त्या भागात रक्ताभिसरण वाढतं. पचनसंस्थेला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या तर दूरच नाही तर शरीरातील घाणही निघून जाते.
अधोमुख श्वानासन : गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी अधोमुख श्वानासन देखील खूप प्रभावी आहे. हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार हाता-पायांवर येतो. पोटाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ज्यामुळे अॅसिडिटीमुळे होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो.
बालासन : बलासनाच्या सरावानं अॅसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. या आसनामुळं पोटाच्या अंतर्गत अवयवांना योग्य प्रकारे मसाज केलं जातं, त्यामुळे सर्व अवयव योग्य पद्धतीने कार्य करू शकतात.
विरभद्रासन २ : विरभद्रासन-2 ज्याला वॉरियर पोज-2 असेही म्हणतात. हे अॅसिडिटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आसन आहे. हे आसन केल्याने पोटाशी संबंधित बहुतेक समस्या दूर होतात. यामुळे पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.
हेही वाचा :
- Soaked Peanuts Benefits : रोज सकाळी खा भिजवलेले शेंगदाणे; तुमचा मेंदू होईल वेगवान...
- Silver Anklets Improve Health : तुम्हाला माहिती का चांदीचे पैंजण घातल्यानं होतात अनेक आरोग्य फायदे; जाणून घ्या
- Benefits of banana : वजन कमी करण्यापासून पचनक्रिया सुधारण्यापर्यंत फायदेशीर आहे केळी; जाणून घ्या काय आहेत फायदे...