ETV Bharat / sukhibhava

World Tuberculosis Day 2023 : जागतिक आरोग्य संघटनेचा क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा निर्धार, जाणून घ्या किती होतात टीबीमुळे मृत्यू

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

author img

By

Published : Mar 24, 2023, 10:37 AM IST

World Tuberculosis Day 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : क्षयरोगाच्या रुग्णांत भारतासह जगात अचानक वाढ झाल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने क्षयरोग संपवण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. या वर्षी हा दिन आपण टीबी संपवू शकतो, या थीमसह साजरा करण्यात येत आहे.

क्षयरोग रुग्णांना समाजापासून राहावे लागते अलिप्त : क्षयरोगाच्या साथीमुळे अनेक शतकांपासून जगभरात मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात प्रगती होऊनही आजही मोठ्या संख्येने नागरिक या आजाराच्या नावानेही घाबरतात. क्षयरोग हा आजार संसर्गजन्य असल्याने बाधित नागरिकांना समाजापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे आपल्याच नातेवाईकांना वेगळे ठेवण्याची वेळ या आजारामुळे कुटूंबियांवर येते.

दरवर्षी दीड लाख नागरिकांचा क्षयरोगाने मृत्यू : क्षयरोग हा जगातील विकसनशील देशांमध्ये एक गंभीर संसर्गजन्य आजार मानला जातो. त्यामुळे दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा क्षयरोग या आजाराने मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरदिवशी जगभरात क्षयरोगाने ४ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी ही आकडेवारी 1.6 मिलियनवर पोहोचते. भारतात क्षयरोगाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात क्षयरोगाच्या आजाराने २०१८ मध्ये तब्बल 6476 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. तर राज्यात दररोज १७ नागरिकांचा क्षयरोगाने मृत्यू होत असल्याचेही या आकडेवारीवरुन पुढे आले आहे.

काय आहे यावर्षीची थीम : जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी एक थीम घेऊन काम करते. या घेतलेल्या थीमवर जगभरात जनजागृती करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी, होय ! आपण टीबी संपवू शकतो ! ही यावर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनासाठी थीम घेतली आहे. या थीमवर जगभरात जनजागृती करण्यात येत आहे. क्षयरोगाच्या साथीविरोधात लढा देण्यासाठी ही थीम घेण्यात आली आहे. क्षयरोगापासून मुक्ती शक्य असल्याची नागरिकांमध्ये आशा जागृत करण्यासाठी ही थीम निवडण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

क्षयरोग म्हणजे काय : क्षयरोग हा प्राणघातक संसर्गजन्य आजार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ मानतात. हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस बॅक्टेरियामुळे होतो. फुफ्फुसांवर क्षयरोगाचे जीवाणू सामान्य असतात. मात्र हा जीवाणू फुफ्फुसाव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांवर परिणाम करू शकतो. या संसर्गाने ग्रस्त रुग्ण खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा, त्याच्याबरोबर संसर्गजन्य न्यूक्लीय थेंब तयार होतो. हा थेंब हवेच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. न्यूक्लीज वातावरणात कित्येक तास सक्रिय राहू शकत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचे लक्ष्य : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये 10.6 दशलक्ष नागरिक क्षयरोगाने आजारी पडले होते. त्यापैकी 1.6 दशलक्ष नागरिकांना या आजारामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले होते. या वर्षी क्षयरोगाचा अंत करण्यासाठी सदस्य राज्यांकडून औषध-प्रतिरोधक क्षयरोगासाठी डब्ल्यूएचओने शिफारस केलेल्या लहान सर्व मौखिक उपचार पद्धतींचा समावेश करण्यात येईल. ही मोहीम गतिमान करण्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने 2023 हे वर्ष क्षयरोगाचा अंत करण्याचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे लाखो लोकांना होणारा त्रास अधोरेखित केला आहे. 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात होणार्‍या संयुक्त राष्ट्र महासभेत संघटना सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना टीबी विरुद्धच्या प्रगतीला गती देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक बांधिलकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Eating almonds before meals : जेवणापूर्वी बदाम खाल्ल्याने प्रीडायबेटिसच्या रूग्णांमध्ये वाढू शकते रक्तातील साखर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.