ETV Bharat / sukhibhava

World Suicide Prevention Day २०२३ : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व... - आत्महत्या न करण्याबाबत जनजागृती

World Suicide Prevention Day २०२३ : जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2003 साली झाली. हा दिवस साजरा करण्यामागे लोकांमध्ये आत्महत्या न करण्याबाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या उपक्रमात अनेक देशांची सरकारेही सहकार्य करतात. जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व...

World Suicide Prevention Day 2023
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 11:05 AM IST

हैदराबाद : World Suicide Prevention Day २०२३ : जगभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण तणाव, नैराश्य या आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत बहुतेक लोक जीवनाचा त्याग करतात आणि मृत्यूला कवटाळतात. मात्र आत्महत्येच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार दरवर्षी सुमारे 8 लाख लोक आत्महत्येद्वारे आपला जीव गमावतात. आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीत सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे. ज्यांचे वय 15 ते 29 वर्षांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे महत्त्व आणखी वाढते.

कधी सुरू झाला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (IASP) ने 2003 मध्ये प्रथमच 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशनने प्रायोजित केला होता. या उपक्रमाचे जागतिक स्तरावर खूप कौतुक झाले. त्यानंतर, पुढील वर्षी 2004 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) औपचारिकपणे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे प्रायोजित केले. तेव्हापासून दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे महत्त्व : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. यातील बहुतेक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेने प्रायोजित केले आहेत. या दिवसाच्या मदतीने लोकांमध्ये केवळ जागरुकता वाढते असे नाही तर लोकांना आत्महत्येशी संबंधित विचार सोडून देण्यासही मदत होते. त्याचबरोबर भारतासह अनेक देशांची सरकारेही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या या उपक्रमात मदत करत आहेत. जर लोकांना आत्महत्या करावी वाटत असेल तर ते सरकारी हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात आणि विनामूल्य समुपदेशन सत्रात उपस्थित राहू शकतात.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा उद्देश : लोकांमध्ये आत्महत्येबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या वर्तनावर संशोधन, डेटा गोळा करणे आणि लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखणे यासारख्या गोष्टींवर चर्चा केली जाते. त्यामुळे लोकांमध्ये आत्महत्येबाबत जागरुकता वाढते आणि ते इतरांना अशी गंभीर पावले उचलण्यापासून रोखू शकतात.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची थीम : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023 ची थीम 'क्रिएटिंग होप थ्रू एक्शन' अशी ठेवण्यात आली आहे. ज्याचा अर्थ 'कृतीतून आशा निर्माण करणे' असा आहे. देशात आणि जगात या दिवशी आयोजित केलेले कार्यक्रम या थीमवर आधारित असतील.

हेही वाचा :

  1. White shoes strain : पांढरे शूज सारखेच होतात खराब; जाणून घ्या शूजवरील डाग काढून टाकण्याचे सोपे मार्ग
  2. Vitamin E capsules for hair : केसांच्या चांगल्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल फायदेशीर; जाणून घ्या फायदे आणि वापराच्या पद्धती
  3. Curly hair care tips : तुमचेही केस आहेत कुरळे; अशी घ्या काळजी, केसांना बनवा चमकदार आणि रेशमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.