हैदराबाद : World Heart Day २०२३ : हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हे संपूर्ण शरीर कार्य करतं. आपण हृदयविकारानं ग्रस्त असल्यास, त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळं हृदय निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या काळात तर तरुणही हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळं हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जागतिक हृदय दिन हा व्यक्तींना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आठवण करून देण्याचं काम करतो.
भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू : 2019च्या तुलनेत 2021मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली नाही. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2019 च्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी अधिक होती. तसेच यामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये हृदयविकाराचा झटका कमी होता. 2017 ते 2021 या कालावधीत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण 22 टक्क्यांनी वाढलं आहे. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, 2012 ते 2021 या 10 वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जागतिक हृदय दिनाचा इतिहास : हा दिवस साजरा करण्याची सुरुवात WHF आणि WHOने केली होती. हा दिवस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं, ते 24 सप्टेंबर 2000 रोजी लाँच करण्यात आलं. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक हृदय दिनाचा उद्देश : जागतिक हृदय दिनाचा उद्देश हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा आहे. आज जागतिक लोकसंख्येला प्रभावित करणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्या आणि आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी WHFने या दिवसाची स्थापना केली.
जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो : लोकांना जागतिक हृदय दिनाविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता कमी आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील लोकांना हृदयाशी संबंधित आजार होतात. त्यामुळं हा दिवस लोकांना हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक हृदय दिन 2023 ची थीम : यावर्षी जागतिक हृदय दिन 'हृदयाचा वापर करा, हृदय जाणून घ्या' या थीमवर साजरा केला जात आहे. आपलं हृदय स्वतः निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणं हा यामागचा उद्देश आहे.
हेही वाचा :
- World Environmental Health Day : पर्यावरण वाचवण्यासाठी तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदला, धोक्यांपासून होईल तुमचं रक्षण
- World Contraception Day 2023 : जागतिक गर्भनिरोधक दिन 2023; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व...
- World Pharmacist day : आजचा दिवस फार्मासिस्टचं कौतुक करण्याचा दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व