फॅमिली डॉक्टर किंवा फॅमिली फिजिशियन हे जगातील प्रत्येक कुटुंबाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. अगदी शरीरातल्या कुठल्याही भागात, किरकोळ दुखणे असले तरीही पहिल्यांदा ज्यांच्याशी संपर्क केला जातो, तो म्हणजे फॅमिली डॉक्टर. म्हणून आज जागतिक फॅमिली डॉक्टर दिनानिमित्त आम्ही वय, लिंग आणि परिस्थिती यांचा अजिबात विचार न करता आपल्या सेवेला हजर राहणाऱ्या, आपल्याकडे तो इमर्जन्सी नंबर असलेल्या फॅमिली डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
जागतिक फॅमिली डॉक्टर दिन २०२१
आरोग्य व्यवस्थेत फॅमिली डॉक्टरांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी, त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी दर वर्षी १९ मे हा जागतिक फॅमिली डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम २०१० मध्ये राष्ट्रीय महाविद्यालये, अकादमी आणि सामान्य चिकित्सक / कौटुंबिक चिकित्सकांच्या शैक्षणिक संघटना ( डब्ल्यूओएनसीए ) यांनी साजरा केला. डब्ल्यूओएनसीए म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ फॅमिली डॉक्टर्स. या वर्षाची थीम आहे ‘ फॅमिली डॉक्टर्ससोबत भविष्याची उभारणी.
फॅमिली डॉक्टर्स किंवा फॅमिली फिजिशियन हा कुटुंबाचाच एक भाग असतो. कुठलाही आजार झाला किंवा तब्येत बिघडली तर पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरांशीच संपर्क साधला जातो. कुठलेही वय, लिंग किंवा कसलाही आजार असो डॉक्टरांनी रुग्णाला सेवा देणे अपरिहार्य आहे. ते सहसा प्राथमिक काळजी आणि रोग्यांना प्रतिबंधात्मक उपायांबद्दल शिक्षण, आरोग्याची स्थिती समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यात मदत करतात. ते समुदाय पातळीवर देखील सेवा देऊ शकतात.
जागतिक फॅमिली डॉक्टर्स दिन २०२१ चे चार स्तंभ
वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ फॅमिली डॉक्टर्स यांनी जागतिक फॅमिली डॉक्टर्स दिन २०२१ च्या चार स्तंभांबद्दल सांगितले. ते पुढीलप्रमाणे –
1. फॅमिली डॉक्टर्स आणि प्राथमिक आरोग्य सेवा टीमसोबत आपले भविष्य उभारणे - आम्ही हे अधोरेखित करू इच्छितो की आरोग्य आणि काळजी घेणार्या व्यावसायिकांच्या मल्टि-डिसिप्लिनरी टीमसमवेत एकत्र काम करणारे फॅमिली डॉक्टर्स हे आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि सर्वांना उच्च गुणवत्तेची आणि परवडणारी काळजी पुरवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
2. फॅमिली डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यासोबत भविष्याची उभारणी – फॅमिली डॉक्टर्स लोककेंद्रित दृष्टिकोन स्वीकारतात. रुग्ण आणि समुदायांना सतत पाठिंबा देतात आणि आयुष्यभर काळजी घेण्याचे सातत्य सुनिश्चित करतात. या सर्वाच्या मध्यभागी रुग्ण आहे.
3. फॅमिली डॉक्टर्स आणि नवीन तंत्रज्ञानाबरोबर भविष्य घडवणे - कोविड १९ या साथीच्या रोगादरम्यान, आरोग्य सेवा व्यावसायिकांना त्यांचे कार्य सुरू ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान मूलभूत साधने म्हणून उदयास आले आहे.
4. फॅमिली डॉक्टर्स आणि तुम्ही मिळून भविष्याची उभारणी करणे – भविष्या घडवण्यासाठी महत्त्वाचे अडथळे कोणते आहेत ? तुम्ही त्यात सहभागी व्हा, आवाज उठवा, तुमचे कार्य आणि प्रयत्न लोकांसमोर आणा आणि फॅमिली डॉक्टर्ससोबत भविष्य घडवण्यासाठी योगदान द्या.
यावर्षीसुद्धा आपण कोविड १९ महामारीशी संघर्ष करीत असताना, कुटुंबांचे डॉक्टर आणि इतर आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्स लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. भारतात, साथीच्या आजाराची दुसरी लाट आल्याने आरोग्य यंत्रणेवर फारच ताण आला आहे. फॅमिली डॉक्टर शक्य असल्यास घरी रूग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांना जागरूक राहण्यास प्रोत्साहित करत आहेत आणि या प्राणघातक रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व संभाव्य प्रतिबंधात्मक उपायांचे अनुसरण करत आहेत.
आज जागतिक फॅमिली डॉक्टर्स दिनानिमित्त आपण एकत्र येऊन आपल्या फॅमिली डॉक्टरांना धन्यवाद देऊ या. कोविड १९ महामारीशी लढा देण्यासाठी ते आपले हृदय आणि आत्मा पणाला लावतात. इतकी वर्ष ते आपल्या सोबत आहेत आणि आपल्यावर सर्वोत्तम उपचार करतात, बरे होण्याची खात्री देतात याबद्दल त्यांचे ऋणी असायला हवे. म्हणून त्यांचे रुग्ण तसेच जबाबदार नागरिक म्हणून या कठीण काळात त्यांचा आदर करणे आणि त्यांचा सल्ला प्रमाणिकपणे पाळणे, हे आपले कर्तव्य आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूमुळे जागतिक स्तरावर कुपोषणाचा धोका वाढला : १० दशलक्ष मुलांचे भविष्य धोक्यात..