ETV Bharat / sukhibhava

World Egg Day 2023 : 'आरोग्यदायी भविष्यासाठी अंडी' या थीमवर साजरा होणार जागतिक अंडी दिन...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 12:47 PM IST

'जागतिक अंडी दिन' दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जगभरात, अंड्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातोय.

World Egg Day 2023
आरोग्यदायी भविष्यासाठी अंडी

हैदराबाद : अंडी हे उच्च प्रथिनं आणि कमी कॅलरी असलेले अन्न आहे. जे नाश्त्यामध्ये खाणं चांगल मानलं जातं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नाश्त्यामध्ये अंड्याचं सेवन केल्यानं आपल्या शरीराच्या दैनंदिन पौष्टिक गरजा तर पूर्ण होतातच, पण दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासही मदत होते. अंड्याचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं आणि मानवी पोषणात त्यांचं महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणं या उद्देशानं दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 13 ऑक्टोबर रोजी 'सुदृढ भविष्यासाठी अंडी' या थीमवर साजरा केला जातोय. 'वर्ल्ड एग डे' ची स्थापना 1996 मध्ये व्हिएन्ना येथे आयईसी परिषदेत झाली होती. ज्यामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी 'जागतिक अंडी दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अंड्याची वैशिष्ट्ये : नाश्त्यासाठी अंडी हा एक चांगला आहार मानला जात असला तरी, त्यापासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ दिवसभरात कधीही खाऊ शकतात. दिल्लीचे पोषणतज्ञ डॉ. दिव्या शर्मा सांगतात की, अंड्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांचे संयोजन एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन आहारातील पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. त्यात उच्च दर्जाची प्रथिनं, ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस्, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन डी आणि 13 जीवनसत्त्वं आणि खनिजं चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. याशिवाय काही विशेष आणि अतिशय फायदेशीर अमीनो अ‍ॅसिडही यामध्ये आढळतात. कॅलरीजबद्दल बोलायचं झाल्यास एका अंड्यामध्ये सुमारे 80-100 कॅलरीज असू शकतात.

अंड्याचे फायदे : डॉ. दिव्या सांगतात की, अंडी विशेषतः नाश्त्यासाठी योग्य मानली जातात, कारण जेव्हा ते रिकाम्या पोटी सेवन केली जातात तेव्हा ते शरीरात चयापचय वाढवतं, ज्यामुळे पचनक्रिया जलद कार्य करते. या व्यतिरिक्त जर आपण त्यात आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल आणि ते शरीराला मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोललो तर त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यानं डोळ्यांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

  • ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट अंड्यांमध्ये आढळतात जे अतिनील किरणांमुळे होणार्‍या डोळ्यांचे केवळ संरक्षणच करत नाहीत तर लहान वयात मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास देखील मदत करतात. याशिवाय हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या इतर काही समस्यांपासून संरक्षण आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए देखील चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे केवळ रातांधळेपणाचा धोका कमी होत नाही तर दृष्टी सुधारते.
  • अंड्यांमध्ये जास्त प्रमाणात असलेले व्हिटॅमिन डी देखील हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते.
  • अंडी हे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचा चांगला स्रोत मानला जाऊ शकतो. जरी याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो, परंतु जर आपण त्याच्या विशेष फायद्यांबद्दल बोललो तर ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील अंड्यांमध्ये आढळतात जे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
  • अंड्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात, जी शरीरातील इतर पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यास मदत करतात. जे इतर फायद्यांसोबतच मेंदूच्या विकासासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक वेळा गरोदर महिलांना गरोदरपणात अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.
  • अंडी चयापचय गतिमान करते. शिवाय त्यात खूप कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही हे खूप उपयुक्त मानले जाते.
  • अंड्यांमध्ये कोलीन असते जे केवळ स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करत नाही तर मूड चांगला ठेवण्यास आणि इतर संज्ञानात्मक प्रक्रिया सुधारण्यास देखील मदत करते. जे चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये उत्साह नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे मानसिक आरोग्य राखण्यासाठीही ते उपयुक्त मानलं जातं.
  • हे लक्षात घेण्यासारखे आहे की संपूर्ण जगात केवळ कोंबडीची अंडी खाल्ली जात नाहीत तर जगाच्या विविध भागांमध्ये उपलब्धतेनुसार बदक, मासे, शहामृग आणि इतर काही प्राण्यांची अंडी देखील खाल्ले जातात. या सर्व प्रकारच्या अंड्यांमधून मिळणारे पोषण आणि फायदे वेगवेगळे असू शकतात.

अंड्यांचे जास्त सेवन हानिकारक : डॉ. दिव्या सांगतात की, काही वेळा अंडी खाल्ल्याने काही शारीरिक स्थिती किंवा समस्यांमध्ये नुकसान होऊ शकते. त्याच बरोबर काही लोकांमध्ये त्याच्याशी संबंधित अ‍ॅलर्जी देखील दिसून येते. म्हणून हे महत्वाचे आहे की कोणत्याही रोगाने ग्रस्त लोक किंवा जे अ‍ॅलर्जीसाठी संवेदनशील आहेत त्यांनी सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय अंड्यांचे जास्त सेवन केल्यानं काही वेळा काही समस्या निर्माण होतात. सामान्यतः, सामान्य आरोग्य असलेल्या लोकांसाठी 2-3 अंडी खाणे आदर्श मानले जाऊ शकतं. परंतु जे लोक जास्त व्यायाम करतात, ते जिममध्ये जातात किंवा कुस्ती, बॉक्सिंग, पोहणे इत्यादी सारख्या अधिक शारीरिक व्यायामाची आवश्यकता असलेले खेळ खेळतात. त्यांच्या शरीराच्या विशेष गरजांनुसार आहारतज्ञ त्यांना त्यांच्या आहारात अधिक प्रमाणात अंड्यांचा समावेश करण्याचे निर्देश देऊ शकतात.

हेही वाचा :

  1. Egg Alternative : अंडी खात नाही का? मग तुम्ही हे अन्न खाऊ शकता...
  2. Egg vs Milk : प्रोटीनसाठी काय चांगले अंडे की दूध, घ्या जाणून....
  3. Egg Benefits For Hair : केसांना अंडी लावण्याचे आहेत अनेक फायदे; कोंडा दूर होण्यास होते मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.