World Coconut Day 2023 हैदराबाद : नारळ हे आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे हे जास्त लोकांना माहीत नाही. दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो. भारत आणि आशिया पॅसिफिक प्रदेशासह अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना 2009 मध्ये झाली. नारळाचे फायदे आणि महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. नारळाचे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
नारळ उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर : नारळाची झाडे पॅसिफिक आणि आशियाई प्रदेशातील देशांमध्ये जास्त प्रमाणात लावली जातात. जगभरात हे देश नारळाचे प्राथमिक उत्पादक आहेत. एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ने जकार्ता येथे पहिला जागतिक नारळ दिवस सुरू केला. या उष्णकटिबंधीय फळाला प्रोत्साहन देण्यासाठी APCC दरवर्षी जागतिक नारळ दिन साजरा करते. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. फिलिपिन्स दुसऱ्या क्रमांकावर असून भारत तिसऱ्या क्रमांकावर नारळ उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. या नारळात अनेक गुण आहेत. कोणते ते जाणून घ्या...
जाणून घ्या नारळाचे फायदे :
- हेल्दी फॅट्स : नारळाच्या मलाईमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात. जे वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया आणि चयापचय क्रियांसाठी चांगले मानले जाते.
- रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी उपयुक्त : नारळाच्या मलईमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात.
- पॉलिफेनॉल समृद्ध : नारळाच्या मलाईमध्ये पॉलिफेनॉल असतात. जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करते.
- पोषणयुक्त : नारळाच्या मलाईमध्ये भरपूर प्रमाणात पोषण असते. त्यात सॅच्युरेटेड फॅटही कमी प्रमाणात आढळते.
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : नारळाचे दूध रोग प्रतिकारशक्ती वाढवते. त्याच्या दुधात लॉरिक अॅसिड असते, जे त्याच्या अँटी-सेप्टिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हे शरीराला जीवाणू, विषाणू आणि बुरशीमुळे होणा-या संसर्गाशी लढण्यास मदत करते.
हेही वाचा :