ETV Bharat / sukhibhava

Hair Care Tips : सुंदर आणि चमकदार केस हवेत? केस धुण्याआधी 'असे' वापरा खोबरेल तेल - Use coconut oil

काळे, लांब, दाट केस प्रत्येकालाच हवे असतात. परंतु, खराब जीवनशैली, जंक फुड, प्रदूषण, तणाव इत्यादींमुळे केस गळणे, कोंडा, केसांची मंद वाढ, कोरडे केस इत्यादी केसांशी संबंधित अनेक समस्या आजकाल लोकांमध्ये सामान्य झाल्या आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना या समस्यांचा सामना करावा लागतो. केसांना खोबरेल तेल (coconut oil) लावल्याने या सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. चला जाणून घेऊया केसांना खोबरेल तेल लावल्याने कोणते (Hair Care Tips) फायदे होतात. (Use coconut oil before washing your hair)

Hair Care Tips
खोबरेल तेल
author img

By

Published : Dec 27, 2022, 1:32 PM IST

मुंबई : खोबरेल तेल हे नारळाच्या आत असलेल्या खोबऱ्यासून बनवले जाते. खोबरेल तेल (coconut oil) केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. केसांच्या अनेक समस्यांवर हा रामबाण उपाय आहे. नारळामधील लॅरिक एसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास साहाय्यभूत असते. नारळाच्या तेलामध्ये बरीच जीवनसतत्त्वे आणि खूप काही नैसर्गिक औषधी गुण असतात. नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप लाभ होऊ शकतो. यासाठी नारळाचे तेलास नैसर्गिक तेल असे म्हटले जाते. खोबऱ्याचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामूळे केसांना लावण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चला जाणून घेऊया केसांना खोबरेल तेल लावल्याने कोणते फायदे होतात. (Hair Care Tips)

  • अनेकांना ही समस्या असते की, त्यांचे केस गळतात, पण त्या जागी नवीन केस उगवत नाहीत, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या उद्भवते. तसेच केसांची वाढही खूप मंद होते. खोबरेल तेलाचा वापर ही समस्या सोडवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही नियमितपणे खोबरेल तेलाचा मसाज करत असाल तर केसांची वाढ जलद होण्यास मदत होईल.
  • तज्ञांच्या मते, नारळाच्या तेलात बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हे टाळूचे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. याच्या वापराने केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
  • खोबरेल तेल लावल्याने टाळूला आर्द्रता मिळते. याच्या वापराने केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांना मॉइश्चरायझेशन करायचे असेल तर खोबरेल तेलाने नक्कीच मसाज करा.
  • जर तुम्ही आंघोळीच्या किंवा केस धुण्याच्या किमान 3-4 तास आधी (Use coconut oil before washing your hair) केसांना खोबरेल तेल लावले तर ते केवळ खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत करत नाही तर केस धुल्यानंतर केसांचे नुकसान देखील टाळते.
  • खोबऱ्याचे तेल केवळ केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरते, असे नाही. आपल्या केसांवर कोमट खोबरेल तेल लावा, त्यानंतर डोक्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून एका टॉवेलने झाकून घ्या. प्लॅस्टिक पिशवीने तेल बराच काळ गरम राहते आणि मुळांचे पोषण करते. हिवाळ्यात केस सुरक्षित ठेवण्यासाठी हा पर्याय निवडा.
  • यामध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, जे कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यास मदत करतात. जर तुम्हाला कोंडा दूर करायचा असेल तर एका भांड्यात 2 चमचे खोबरेल तेल घ्या, त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण केसांना लावा, 30 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.