डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे (Benefits of Pomegranate) जाणून घेऊया. चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एका डाळिंबाचे (Pomegranate) सेवन करावे. डाळिंबाचा रस (Pomegranate juice) प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
शरीर मजबूत आणि सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस आणि आवळा रस (Amla juice) एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी. नंतर ते आठ दिवस उन्हात ठेवावे. तयार झालेल्या सरबताचे रोज १ कपभर प्यावे. घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीचा रस काढा. त्या रसाने साधारण आठ दिवस गुळण्या कराव्या. पोटात गॅस होणे किंवा शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी होते. डाळिंब हे रक्त आणि शक्तिवर्धक आहे. ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे. मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्यावा.
जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबते. आम्लपित्त, अपचन, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते. बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा. डाळिंबाच्या सालाचे पावडर बनवून त्याचा चेहऱ्यावर लेप ( Paste of Pomegranate) लावल्यास त्वचा (Skin) सुंदर दिसेल.