हैदराबाद - कोविड-१९च्या उपचारासाठी विकसित करण्यात येणाऱ्या लसीची यशस्वितेची चाचणी मध्यावर आलेली असताना अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने (जीडब्ल्यू) एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार रोगविरोधी (अँटीमाइक्रोबियल) आणि दाह शमविणारा (एंटी-इंफ्लेमेटरी) रेणू म्हणून ओळखला जाणारे नायट्रिक अॅसिड कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
जीडब्ल्यूच्या मते, श्वासोच्छवासाचा त्रास उद्भवून फुफ्फुसाच्या बिघाडास कारणीभुत असलेल्या रक्तवहिन्यासंबंधी प्रणालीचे कार्य सुरळीत ठेवण्यात आणि 'इन्फ्लेमेटरी कास्केड्स' नियमित करण्यात नायट्रिक ऑक्साईड महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
'इन्फ्लेमेटरी कास्केड्स' ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात एका विशिष्ट प्रणालीने दाह निर्माण होतो. या दाह निर्माण होणाऱ्या प्रणालीचा सामना करणारी रोगप्रतिकारक शक्ती अद्याप विकसित झालेली नाही.
जीडब्ल्यू डॉक्टरांच्या पथकाने कोरोना विषाणू रोगजनकाचा अभ्यास करताना १९९३ ते २०२० या काळातील अहवालांचा अभ्यास केला आणि त्यानंतर श्वसनाच्या आजारावर उपचार म्हणून नायट्रिक ऑक्साईडचा वापराचा निष्कर्ष नोंदविला.
जीडब्ल्यूडब्ल्यू डॉक्टर श्वास घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या (इनहेल्ड) नायट्रिक ऑक्साईडला प्राधान्य देतात. याचा कोरोना महामारीच्या काळात घेण्यात आलेल्या क्लिनिकल निकालांमध्ये चांगला परिणाम दिसून आला आहे. दरम्यान पुढे जाण्याअगोदर नायट्रिक ऑक्साईडचा किती प्रमाणात डोस घ्यावा आणि प्रोटोकॉलमधील भिन्नता तपासली पाहिजे असे डॉक्टरांच्या टीमला वाटते.
“आपले शरीर आणि आपल्या आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांवर परिणाम घडविण्याची क्षमता असलेली महामारी म्हणून कोविड-१९ हा आजार समोर आला आहे. दरम्यान या रोगाविरोधात लढून रुग्णांमध्ये आणि समाजात होणारा रोगाचा फैलाव कमी करण्यासाठी एका प्रभावी घटकाची नितांत आवश्यकता आहे,” असे एमडी आणि या अहवालाचे वरिष्ठ सह लेखक अॅडम फ्रीडमॅन म्हणाले.
हेही वाचा : '2021 मध्येच येणार कोरोनावरची लस, तोपर्यंत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग हेच शस्त्र'