ETV Bharat / sukhibhava

मेंदूतल्या दुखापतीमुळे होतात लघवीचे त्रास - मेंदूतल्या दुखापतीचे आरोग्यावर परिणाम

लघवी करणे हे शरीरातले महत्त्वाचे कार्य आहे यासाठी शरीरातल्या वेगवेगळ्या भागांतून समन्वय साधला जातो. लहानपणी सगळेच जण दुसऱ्याच्या मांडीवर सू करतात. (सध्या डायपरमुळे ही मजा निघून गेली आहे). पण जसे आपण मोठे होतो तसा मेंदू हे कार्य करण्यावर नियंत्रण ठेवायला लागतो. टाॅयलेट ट्रेनिंगमध्ये सामाजिक नियमांचा मोठा वाटा आहे.

Urinary problems in brain injuries
मेंदूतल्या दुखापतीमुळे होतात लघवीचे त्रास
author img

By

Published : Sep 13, 2020, 1:50 PM IST

लघवी करणे हे शरीरातले महत्त्वाचे कार्य आहे यासाठी शरीरातल्या वेगवेगळ्या भागांतून समन्वय साधला जातो. लहानपणी सगळेच जण दुसऱ्याच्या मांडीवर सू करतात. ( सध्या डायपरमुळे ही मजा निघून गेली आहे. ) पण जसे आपण मोठे होतो तसा मेंदू हे कार्य करण्यावर नियंत्रण ठेवायला लागतो. टाॅयलेट ट्रेनिंगमध्ये सामाजिक नियमांचा मोठा वाटा आहे.

दुसरे म्हणजे प्रौढ झाल्यानंतर दुसरे कुणी आपले लघवीचे कपडे साफ करत आहे, हे कुणालाच आवडणार नाही. पण अनेकदा मेंदूला दुखापत झाल्यानंतर लघवी होण्याची क्रिया, लघवीवर नियंत्रण असणे आणि ती बाहेर फेकणे यावर परिणाम होतो. यामुळे रुग्ण आणि त्याची काळजी घेणारा दोघांनाही खूप त्रासदायक होते. पुढे जाऊन याचे सामाजिक परिणामही उद्भवू शकतात.

ई टीव्ही सुखी भवच्या टीमने गोव्यातल्या मडगाव इथल्या रॉयल हॉस्पिटल रेनल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. शैलेश कामत, एमएस, डीएनबी, युरोलॉजी, एमएनएएमएस, एफआयसीएस, वरिष्ठ मूत्रतज्ज्ञ आणि आंद्रोलॉजिस्ट यांच्याशी संवाद साधून याबद्दलची माहिती मिळवली.

आपला मेंदू लघवीवर कसे नियंत्रण ठेवतो ?

लघवीच्या चक्राचे २ टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे मूत्र संचय आणि दुसरा लघवी बाहेर फेकणे. मेंदूमध्ये दोन केंद्र आहेत. एक केंद्र मूत्राशय भरले जात असताना तुम्हाला निवांत ठेवते. दुसरे केंद्र लघवी होताना कार्यरत असते. काहीही त्रास न होता लघवी होण्यासाठी या दोन्ही केंद्रांचा एकमेकांशी ताळमेळ असावा लागतो.

स्ट्रोक्समुळे लघवी होताना अडचण येऊ शकते का ?

होय. एखाद्याला स्ट्रोक आला तर मूत्राशयात मूत्र संचय करणारे केंद्र बिघडते. याचा परिणाम मूत्राशय पूर्ण भरले आहे असे वाटत राहते. या स्थितीत मूत्राशय सक्रिय राहते. त्यामुळे रुग्णाला सारखे लघवीला लागते. शिवाय त्याला घाईही होते. कधी कधी हे इतके तीव्र असते की त्याला किंवा त्याला अंतवस्रातच लघवी होते.

यावर तुम्ही कसा उपचार करता ?

पहिल्यांदा ही लक्षणे असलेल्या रुग्णाच्या मेंदूचे सीटी किंवा एमआरआय स्कॅन केले जाते. त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मूत्राशयाचे अल्ट्रा साउण्ड केले जाते. त्यानंतर मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही रुग्णाला मूत्राशय सिडॅटिव्हज देतो. बऱ्याचदा या रुग्णांना शौच बाहेर टाकतानाही समस्या उद्भवतात.

मेंदूला दुखापत झाल्याचा परिणाम लैंगिक कार्यावरही होतो का ?

हो. परिणाम होतो. अर्थात, मेंदूमधल्या कुठल्या भागावर परिणाम झालाय, यावर हे अवलंबून असते. याचा परिमाण असा होतो की –

१ ) सेक्स करण्याची इच्छा कमी होते.

२ ) मज्जातंतूंना झालेल्या दुखापतींमुळे इरेक्शन होत नाही. अशा वेळी अँड्रोलाँजिस्टचा सल्ला घेणे योग्य कारण प्रत्येक समस्या वेगळी असते. त्याप्रमाणे औषधे किंवा शस्त्रक्रियेने उपचार केला जातो.

या सर्व स्थिती समजून घेतल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना दीर्घ काळ चालणाऱ्या उपचारांना आणि होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यास मदत होते. यामध्ये जागरुकता निर्माण केली तर रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्याला चांगली तयारी करता येते आणि योग्य प्रकारे सामोरे जाता येते.

अधिक माहितीसाठी डॉ. शैलेश कामत यांच्याशी shaileshkamat@yahoo.com इथे संपर्क साधावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.