हैदराबाद Tulsi Oil Benefits : तुळशीच्या रोपाचे फायदे आपण ऐकत असतो. सौंदर्यासोबतच तुळशीची पानं आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. ते केस आणि दातांच्या काळजीसाठी विशेषतः चांगले आहेत. टाळूला खाज सुटणं आणि डोक्यातील कोंडा यांचा त्रास असलेल्यांसाठी तुळशीचं तेल एक चांगला उपाय आहे. तुळशीला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानलं जातं. आपल्या देशात जवळपास प्रत्येकाच्या घरात तुळशीचं रोप असतं. केवळ अध्यात्मिकच नाही तर आयुर्वेदालाही त्यात मोठं स्थान आहे. ही वनस्पती औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखली जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी, लोह, फायबर, ऑल्लिक अॅसिड आणि युजेनॉल यांसारखे पोषक घटक असतात.
तुळशीचे तेल आरोग्य फायदे : तुळशीच्या वनस्पतीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट, वृद्धत्वविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ही पानं रोज पाण्यात टाकून प्यायल्यानं अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तुळशीची काही पानं दररोज चघळल्यानं सर्दीसारख्या समस्या दूर होतात. तुळशीची पानं आणि अंड्याची पांढरी पेस्ट मिक्स करून २० मिनिटे चेहऱ्याला लावून नंतर चेहरा धुवावा. आठवड्यातून एकदा असे केल्यास त्वचेवरील सुरकुत्या पडणार नाहीत तसंच चेहरा उजळ होईल. तुळशीच्या रसाचे नियमित सेवन त्वचा, टाळू आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दरम्यान, तुळशीच्या तेलाचेही अनेक आरोग्य फायदे आहेत. आता असं तुळशीचं तेल कसं बनवायचं ते जाणून घ्या.
तुळशीचं तेल कसं बनवायचं : तुळशीच्या पानांपासून तेल तयार करून वापरता येतं, ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. याचाच एक भाग म्हणून आधी तुळशीच्या पानांसोबत खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल तयार करावं. पण तुळशीची पानं ताजी असल्याची खात्री करा. तुळशीची पानं पाण्यात चांगली धुवून ओलावा जाईपर्यंत वाळवाव्यात. त्यानंतर काचेची बाटली घ्या आणि त्यात तुळशीची वाळलेली पानं टाका. पानं कुस्करून बाटलीत ठेवल्यानं अधिक सुगंध येतो. तुळशीच्या पानांनी भरलेल्या बाटलीत तुमच्या आवडीचं तेल (नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल) भरून ठेवा. तेलानं भरलेली बाटली सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा. बाटली २ ते ३ आठवडे अशीच ठेवा. ही बाटली दररोज एकदा हलक्या हातानं हलवा. यामुळे तुळशीची पानं कुस्करून तेलात चांगली मिसळतील. दोन ते तीन आठवड्यांनंतर बाटलीतील तेल कोरड्या कापडाच्या साहाय्यानं दुसऱ्या बाटलीत गाळून घ्यावं (वस्त्रगाळ). काढलेलं तेल थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावं. त्यात हवा जाणार नाही याचीही काळजी घ्या. हे तेल नियमितपणे वापरावं.
हेही वाचा :