ETV Bharat / sukhibhava

Traffic Related Pollution : वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दोन कोटी मुलांना अस्थमाचा धोका - लॅन्सेट

लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ (Lancet Planetary Health) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये 2019 मध्ये जागतिक स्तरावर NO2 संबंधित अंदाजे 1.85 दशलक्ष नवीन बालरोग दमा केसेस शहरी भागात दोन तृतीयांश एवढे आढळून आले.

asthma
asthma
author img

By

Published : Jan 7, 2022, 4:56 PM IST

हैदराबाद - जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी (George Washington University) नायट्रोजन डायऑक्साइड किंवा NO2 च्या जमिनीच्या एकाग्रतेचा अभ्यास केला. टेलपाइप वाहनाचे उत्सर्जन, पॉवर प्लांट आणि औद्योगिक साइट्समधून होते. त्यांनी 13,000 हून अधिक शहरांमध्ये 2000 ते 2019 पर्यंत मुलांमध्ये विकसित झालेल्या दम्याच्या नवीन प्रकरणांचा अभ्यास केला.

" अभ्यासात असे आढळून आले आहे की नायट्रोजन डायऑक्साइडमुळे (Nitrogen Dioxide) मुलांना दमा होण्याचा धोका आहे. आणि ही समस्या विशेषतः शहरी भागात तीव्र आहे," लेखाच्या लेखिका आणि विद्यापीठातील पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्याच्या प्राध्यापक सुसान अॅनेनबर्ग म्हणाल्या. "निष्कर्षांवरून असे सूचित होते की स्वच्छ हवा मुलांना निरोगी ठेवण्याच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असणे आवश्यक आहे," ती पुढे म्हणाली. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ (Lancet Planetary Health) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये 2019 मध्ये जागतिक स्तरावर NO2 संबंधित अंदाजे 1.85 दशलक्ष नवीन बालरोग दमा केसेस दोन तृतीयांश शहरी भागात आढळून आले.

दक्षिण आशियात जास्त NO2 प्रदूषण

युरोप आणि यूएसमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा आढळून आली. घाणेरडी हवा आणि विशेषतः NO2 प्रदूषण, दक्षिण आशिया, (South Asia), उप-सहारा आफ्रिकन (Sub-Saharan African) आणि मध्य पूर्व यात वाढत आहे. NO2 प्रदूषणाशी निगडीत बालरोग, तसेच दमा प्रकरणे (Paediatric asthma) दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेसाठी सार्वजनिक आरोग्य जास्तीचे ओझे दर्शवतात. त्याच जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या अहवालात विद्यापीठातील 2019 मध्ये 1.8 दशलक्ष अधिक मृत्यू हे शहरी वायू प्रदूषणाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अॅनेनबर्ग हे म्हणतात..

86 टक्के प्रौढ आणि मुले WHO ने राखून दिलेल्या गाईडलाईननुसार धोकादायक शहरांमध्ये राहतात. "जीवाश्म इंधनावर चालणारी वाहतूक (Fossil fuel-powered transportation) कमी केल्याने मुलांना आणि प्रौढांना श्वास घेण्यास मदत होऊ शकते. लहान मुलांचा दमा आणि जास्त मृत्यूचे प्रकरणात घट होऊ शकते." असेही अॅनेनबर्ग म्हणाले." तसेच हरितगृह वायू उत्सर्जनदेखील कमी केल्यास, निरोगी हवामान होईल."

हेही वाचा - Benefits of Steam Inhalation - हिवाळ्यात वाफ घेण्यामुळे 'हे' होतात फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.