अक्वेरियमधील माशांची गंभीरतेने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण जर त्यांची नियमित काळजी आणि अक्वेरियम स्वच्छता केली नाही, तर मासे आजारी पडू शकतात आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अक्वेरियमच्या स्वच्छतेबाबत आणि माशांच्या काळजीबाबत इंदौरच्या पेट बाजारातील मासे विक्रेता सौरव परदेसी यांनी माहिती दिली. त्यांनी अक्वेरियमधील माशांची देखभाल करण्याबाबत अनेक उपयुक्त टिप्स दिल्या. सौरव सांगतात की, माशांच्या दीर्घायुष्यासाठी अनेक बाबी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत जसे,
- कोणत्या प्रकारचा मासा पाळला जात आहे.
- माशांचा आकार आणि संख्येनुसार अक्वेरियमचा आकार.
- अक्वेरियमची नियमित स्वच्छता.
अक्वेरियम कसे असावे?
अनेक लोक काचेच्या मटक्यात दोन किंवा तीन लहान मासे ठेवणे पसंत करतात. मात्र, जे लोक मोठा डब्ब्याच्या आकाराचा अक्वेरियम ठेवतात त्यात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे जसे, फिल्टर, हिटर इत्यादी. अक्वेरियमच्या पाण्याची नियमित स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. बाजारात अनेक प्रकारचे फिल्टर मिळतात जसे, मेकॅनिकल फिल्टर, जैविक फिल्टर आणि केमिकल फिल्टर. मात्र, त्यांना विकत घेण्याअगोदर अक्वेरियमचा आकार काय आहे आणि त्याच्यात जवळपास किती मासे राहतील, या बाबींची माहिती असणे गरजेचे आहे.
अक्वेरियमला कधीही थेट उन्हा खाली ठेवू नये. त्यांना अशा ठिकाणी ठेवा जेथून त्यांची खाली पडण्याची शक्यता राहू नये. तसेच, अक्वेरियमधील पाण्याला स्वच्छ करणारा फिल्टर हा विजेवर चालतो, त्यामुळे शक्यतो अक्वेरियम पावर प्लगजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
अक्वेरियमची स्वच्छता गरजेची
माशांच्या दीर्घायुष्यासाठी अक्वेरियमची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. अक्वेरियममधील फिल्टर प्रणाली पाण्यातील दूषित पदार्थांना नष्ट करते. त्याचबरोबर, नियमित अंतराने अक्वेरियममधील पाणी बदलने देखील खूप गरजेचे आहे. महिन्यातून कमीत कमी एकदा तरी अक्वेरियममधून माशांना बाहेर काढून त्यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, पाण्याचे तापमाण योग्य ठेवण्यासाठी आणि आवश्यक प्रकाशासाठी अक्वेरियममध्ये हिटर आणि प्रकाशाची पूर्ण व्यवस्था असणे गरजेचे आहे.
अक्वेरियममधील पाणी स्वच्छ राहावे यासाठी त्यातील सजावटीचे सामान देखील स्वच्छ राहणे गरजेचे आहे. त्याचबरबोर, आठवड्यातून एकदा तरी अक्वेरियममधील पाण्याची पीएच स्तर मोजणे देखील महत्वाचे आहे.
अक्वेरियमधील सजावटीच्या वस्तू टोकदार नसाव्यात
माशांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे अक्वेरियम छोटा असो किंवा मोठा त्यामध्ये ठेवण्यात येणारे सजावटीचे सामान हे नोकदार किंवा हानी करणारे नसावे. लोक अक्वेरियममध्ये प्लास्टिकची झाडे आणि इतर सजावटीच्या वस्तू ठेवतात, ज्यांची स्वच्छता देखील नियमित होणे गरजेचे आहे.
अनेक लोक अक्वेरियममध्ये वास्तविक वनस्पती देखील लावतात. अशा अवस्थेत अक्वेरियमध्ये आवश्यक प्रकाशाची व्यवस्था असणे गरजेचे आहे, कारण अक्वेरियममधील झाडांना कमीत कमी 12 तासांपर्यंत थेट प्रकाशाची गरज असते. अक्वेरियमला सजवण्यासाठी अमेजन स्वर्ड, जावा फर्न लावता येऊ शकते.
समान आकाराची मासे एकसाथ ठेवा
अक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी लहान मासे खूप चांगला पर्याय असतात. सौरभ परदेसी सांगतात की, अक्वेरियमध्ये एकत्र ठेवण्यात येणाऱ्या माशांची खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याबाबत माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर, त्या कोणत्या प्रकारच्या पाण्यात रहतात याबाबत देखील माहिती असणे गरजेचे आहे. जसे, काही मासे खारट पाण्यातच जिवंत राहतात. काही माशांना गोड्या पाण्यातील मासे म्हणतात. काही मासे खूप शांत असतात. मात्र, काही मासे हे खोडकर आणि हिंसक असतात, जे शात माशांना हानी पोहचवू शकतात.
छोट्या अक्वेरियमसाठी सामान्यत: गोल्डन फिश, निऑन टेट्रा, जेबरा फिश आणि बौना गुरामी माशांना आदर्श मानले जाते. माशांना विकत घेण्यापूर्वी त्यांच्या राहण्यासाठी आवश्यक गरजांना देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे जसे, काही माशांना फक्त गटामध्ये राहायला आवडते. अशा माशांना नेहमी कमीत कमी चार ते पाचच्या संख्येत एकत्र ठेवावे लागते, अन्यथा ते थोड्या काळासाठीच जिवंत राहतात. मासे नेहमी जोड्यांमध्ये विकत घ्यावे.
अधिक जास्त आहार देऊ नये
अक्वेरियममध्ये राहणाऱ्या माशांना दिवसातून 2 पेक्षा अधिक वेळ जेवण देऊ नये. आहाराची मात्रा ही माशाच्या प्रकारावर अवलंबून असते. आवश्यक्तेपेक्षा अधिक जेवण माशांच्या आरोग्याला हानी पोहचवू शकतात. त्याचबरोबर, उरलेले अन्न अक्वेरियमच्या तळाला राहून ते अस्वच्छतेचे कारण ठरू शकते.
माशांच्या आरोग्याची काळजी घ्या
अक्वेरियममधील माशाचे आरोग्य तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, तो नियमित पोहत आहे की, नाही किंवा त्याच्यावर कोण्या प्रकारचे डाग दिसून येत आहे, या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर, एखाद्या माशामध्ये ही दोन्ही लक्षणे दिसून येत असतील, तर इतर माशांना दुसऱ्या ठिकाणी ठेवले पाहिजे, अन्यथा दुसऱ्या माशांचा आजारी पडण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा - मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी 'या' उत्पादनांचाही होतो वापर, वाचा..