ETV Bharat / sukhibhava

पाळीव प्राणी पाळण्याचा विचार आहे? त्याआधी 'या' बाबी नक्की वाचा..

अनेक देशांमध्ये कोविड - 19 मुळे लॉकडाऊन लागले. त्यादरम्यान मोठ्या संख्येने लोकांना विविध कौटुंबिक, सामाजिक व आरोग्यासंबंधी परिस्थितींमुळे एकाकीपणाचा सामना करावा लागला. परंतु, बरीच आकडेवारी दर्शवते की, पाळीव प्राणी पाळणाऱ्यांवर या महामारीचा परिणाम तुलनेने कमी आहे. यातूनच प्रेरणा घेऊन आजकाल लोकांमध्ये पाळीव प्राणी घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. मात्र, पाळीव प्राणी समस्या देखील निर्माण करू शकतात, त्यामुळे त्यांची निवड, त्यांची गरज यांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आरोग्याला धोकादायक असे काही होऊ नये म्हणून काही बाबी लक्षात घेणे देखील गरजेचे आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभव' तुमच्याशी पुढील माहिती शेअर करत आहे.

author img

By

Published : Sep 25, 2021, 7:20 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

पाळीव प्राण्यांना मनुष्याचा सर्वात चांगला मित्र समजल्या जाते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार (सीडीसी) घरी पाळीव प्राणी असण्याचे अनेक आरोग्यासंबंधी लाभही असतात, जसे की, ते व्यायाम करणे, घरातून बाहेर निघणे आणि सामाजिककरणाच्या संधी वाढवू शकतात. त्याचबरोबर, नियमित पाळीव प्राण्यांसोबत चालल्याणे किंवा खेळल्याणे रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि ट्राइग्लिसराईडची पातळी कमी होऊ शकते. मात्र, अनेकदा काही विशिष्ठ परिस्थितीत पाळीव प्राणी समस्येचे कारण देखील ठरू शकतात, त्यामुळे कोणत्याही पाळीव प्राण्याला घेण्यापूर्वी काही विशिष्ठ बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या संगोपनाशी संबंधित संपूर्ण माहिती घेणे देखील गरजेचे आहे.

पाळीव प्राणी पाळण्याचे आरोग्य फायदे

या विषयी करण्यात आलेल्या विविध आभ्यासांच्या निष्कर्षांतून असे लक्षात आले की, लोक आणि त्यांचे पाळीव प्राणी यांच्यातील बंध शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करते. इतकेच नव्हे तर, प्राण्यांसोबत घालवलेला वेळ आणि त्यांचे प्रेम एकाकीपणा दूर करण्याबरोबरच मनाला देखील अनंदी करते आणि उदासीनता व्यवस्थापित करण्यास मदत करते.

तज्ज्ञांनुसार पाळीव प्राणी पाळण्याचे काही आरोग्य लाभ पुढील प्रमाणे आहेत,

1) रक्तदाबात कमतरता.

2) कोलेस्टेरॉलच्या पातळीत कमी.

3) ट्राइग्लिसराईडच्या पातळीत कमी.

4) एकटेपणाच्या भावनेत कमी.

5) व्यायाम आणि बाहेरील उपक्रमांसाठी वाढलेल्या संधी.

6) समाजीकरणाच्या संधीत वाढ.

पाळीव प्राणी पाळण्याचे फायदे आपण बघितले, परंतु त्यांचे संगोपण हे नेहमी सोपी नसते. अनेकदा ते एखादी आजार किंवा संसर्ग, जूनोटिक आजाराचे कारण देखील होऊ शकते. तर, अनेदा त्यांच्यामुळे पालकांना परिस्थितीजन्य समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, पाळीव प्राण्यांना आपल्या आयुष्याचा भाग बनवण्यापूर्वी काही विशेष बाबी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे.

पाळीव प्राणी निवडण्याअगोदर लक्षात ठेवावयाच्या बाबी

1) प्रौढ झाल्यावर पाळीव प्राण्याचा आकार किती मोठा असेल?

2) त्याचे कमाल वय किती असेल?

3) त्याची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी किती खर्च येईल?

4) तुमच्याकडे पाळीव प्राण्याची योग्य काळजी घेण्यासाठी आणि त्याची स्वच्छता करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का?

5) निरोगी राहण्यासाठी पाळीव प्राण्याला कोणत्या प्रकारच्या घराची आवश्यकता असेल?

6) त्याचे आहार आणि अन्नासंबंधी आवश्यकतांबद्दल माहिती.

7) तुमचे घर, अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये पाळीव प्राणी ठेवण्याची परवानगी आहे का?

8) घरी लहान मुले, वृद्ध, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक आहेत का? ज्यांची प्रकृती प्राण्यांद्वारे होणाऱ्या लहान मोठ्या समस्यांमुळे प्रभावित होऊ शकते?

9) घरातील कोणी पाळीव प्राणी किंवा त्यांच्या केसापासून कुणाला अ‍ॅलर्जी तर नाही ना?

विचार करून पाळीव प्राण्यांची करा निवड

सामान्यत: 5 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाची मुले, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणारे लोक आणि 65 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये प्राण्यांमुळे पसरणारे आजार होण्याची शक्यता अधिक असते. गर्भवती महिलांना देखील प्राण्यांशी संबंधित आजारांसाठी धोकादायक श्रेणीत ठेवल्या जाते. त्यामुळे, नवा पाळीव प्राणी घेण्यापूर्वी काही बाबी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत.

- 5 वर्षे व त्यापेक्षा कमी वयाची मुले असलेल्या कुटुंबांमध्ये कासव, सरडा, साप, बेडूक, टोड किंवा कोंबडा पाळू नये. कारण, या प्राण्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या हानिकारक जंतूंमुळे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

- कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांनी पाळीव प्राणी निवडण्यापूर्वी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

- गर्भवती महिलांनी नवीन मांजर पाळणे किंवा भटक्या मांजरी विशेषत: मांजरीच्या पिल्लांना सांभळणे टाळले पाहिजे. मांजरीमध्ये आढळणारे परजीवी टोक्सोप्लाजमोसिजचे कारण बनू शकते. हा एक असा आजार आहे ज्यामुळे जन्म दोष होऊ शकतो. जर तुम्ही गर्भवती असाल तर, तुम्हाला तुमच्या विद्यमान मांजरीला सोडण्याची गरज नाही, परंतु गर्भधारणेदरम्यान मांजरीशी संबंधित कामे विशेषत: त्यांच्या स्वच्छतेचे कार्य टाळले पाहिजे.

- गर्भवती महिलांना लिम्फोसाइटिक कोरियोमेनिन्जाइटिस विषाणूच्या संपर्कात येण्यापासून वाचवण्यासाठी उंदिर, चिचुंद्री किंवा त्यांच्या प्रजातींच्या इतर प्राण्यांशी संपर्क टाळावा. याने देखील होणाऱ्या मुलांमध्ये जन्म दोष होऊ शकतो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमच्या जवळ एक पाळीव रोडेंट (rodent) आहे तर थेट त्याच्या संपर्कात येण्याचे टाळा आणि कोण्या दुसऱ्याला त्याचे घर स्वच्छ करण्यास सांगा.

स्त्रोत - रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी)

हेही वाचा - सावधान..! 'या' 5 सवयी धुम्रपानपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.