ETV Bharat / sukhibhava

Shoulder Dislocated : खांदा निखळल्यास करू नका दुर्लक्ष, नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत - शोल्डर डिस्लोकेटेड

खेळताना पडल्यानंतर किंवा मार लागल्याने खांदा निखळण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र खांदा निखळण्याची घटना हलक्यात घेऊ नये, असा सल्ला जयपूरचे ऑर्थोपेडिक सल्लागार डॉ संजय राठी यांनी दिला आहे.

Shoulder Dislocated
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2023, 10:48 AM IST

हैदराबाद : खांदा निखळणे ही एक सामान्य समस्या मानली जाते. यामध्ये व्यक्तीच्या खांद्याचे हाड त्याच्या जागेवरून पूर्णपणे किंवा अंशतः घसरते. याला इंग्रजीत शोल्डर डिस्लोकेटेड असेही म्हणतात. निखळलेल्या खांद्याचे कारण विचारात न घेता, त्याची त्वरित तपासणी आणि उपचार करणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा यामुळे पीडित व्यक्तीच्या खांद्यावर तीव्र वेदना निर्माण होतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचा दावा जयपूर येथील मुस्कान क्लिनिकचे ऑर्थोपेडिक सल्लागार डॉ. संजय राठी यांनी केला आहे.

हलक्यात घेऊ नका खांदा निखळल्याची समस्या : खेळताना पडल्यामुळे किंवा मार लागल्याने एखाद्या व्यक्तीचा खांदा निखळला अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. खांदा निखळणे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो हाडापासून वेगळा होणे. मात्र डिस्लोकेटेड शोल्डर म्हणजे कोणत्याही कारणास्तव खांद्याचे हाड सॉकेटमधून निखळले जाते. खांदा हा आपल्या शरीराचा एक असा सांधा आहे जो इतर सांध्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आणि प्रत्येक दिशेने फिरू शकतो. आपल्या हाताच्या वर एक कप आकाराचा खांद्याचा सॉकेट आहे. तो हाताचे हाड खांद्याला जोडतो. खांदा हा एक अस्थिर सांधा मानला जातो आणि अपघात, खेळ किंवा पडणे यासह कोणत्याही कारणामुळे खांद्याला आघात झाल्यानंतर वरच्या हाताचे हाड खांद्याच्या सॉकेटमधील जागेपासून निखळण्याची शक्यता असते. याला सामान्य भाषेत डिस्लोकेटिंग द शोल्डर म्हणतात. खांद्याच्या निखळण्याच्या गंभीर स्थितीत अनेक वेळा हाड त्याच्या ठिकाणाहून हलते. त्या ठिकाणचे स्नायू, अस्थिबंधन आणि कंडरा तुटण्याची देखील शक्यता असल्याचा दावा जयपूर येथील मुस्कान क्लिनिकचे ऑर्थोपेडिक सल्लागार डॉ. संजय राठी यांनी केला आहे.

काय आहेत खांदा निखळण्याची कारणे : खांदा निखळल्यानंतर व्यक्ती सामान्य काम करू शकत नाही. खांदा निखळलेल्या व्यक्तीला काम करताना त्रास होतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या खांद्याला धक्का लागल्याने किंवा पडल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. खांदा निखळल्यास खालीलप्रमाणे लक्षणे असतात.

  • खांद्यामध्ये सतत तीव्र वेदना
  • हात कोणत्याही दिशेने फिरवू शकत नाही
  • खांद्याच्या स्नायूंमध्ये क्रॅम्पिंगची भावना
  • कधीकधी तीव्र वेदनांसह जास्त घाम येऊन मळमळ आणि उलट्यासारखे वाटणे
  • खांद्याच्या आकारात बदल
  • कधीकधी पीडित व्यक्ती बेशुद्ध देखील होऊ शकते

कसे करावे उपचार : खांदा निखळल्यास नागरिक खांदा वारंवार हलवण्याचा प्रयत्न करतात. त्यासह काही नागरिक खांदा निखळल्यास मसाज किवा इतर घरगुती उपाय करतात. मात्र असे घरगुती उपाय करणे चुकीचे आहे. खांदा हलवण्यात समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा केवळ खांदेदुखी आणि इतर समस्या वाढू शकतात असे नाही तर खांद्याभोवतीचे स्नायू आणि रक्तवाहिन्या देखील खराब होऊ शकत असल्याचा दावा डॉ. संजय राठी यांनी केला आहे.

हेही वाचा - Chandra Grahan 2023 : जाणून घ्या कधी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण, कुठे दिसेल चंद्रग्रहण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.