ETV Bharat / sukhibhava

सिंहासन योग : रोग प्रतिकारशक्तीसोबतच श्वसननलिका तंत्र आणि पेशींंना मजबूत करणार योगाभ्यास - डॉ. जान्हवी कथरानी

फक्त कोरोना काळातच नव्हे तर कोणत्याही संक्रमणाला रोखण्याची प्रतिकारशक्तीची गरज असते. हा योग शरिरातील प्रतिकारशक्तीसोबतच फुफ्फुसाच्या क्षमतेत सुधारणा करते. या योगाविषयी अधिक माहितीसाठी 'ईटीव्ही भारत सुखीभव'ने डॉ. जान्हवी कथरानी, फिजियोथेरेपिस्ट यांच्याशी चर्चा केली आहे.

सिंहासन योग
सिंहासन योग
author img

By

Published : Jul 9, 2021, 7:58 PM IST

Updated : Jul 9, 2021, 10:56 PM IST

सिंहासन प्राणायम हा मानवी रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि श्वसननलिका तंत्र तसेच पेशींना मजबूत करण्यास सहाय्य करणारा अत्यंत प्रभावी योग आहे. सहा वर्षावरील कोणतीही व्यक्ती हा योग करू शकतो. इतकेच नव्हे तर गर्भवती महिला सुद्धा काही सूचनांचे पालन करुन हा योग करु शकतात.

सिंहासन : रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्राचीन योगाभ्यास

फक्त कोरोना काळातच नव्हे तर कोणत्याही संक्रमणाला रोखण्याची प्रतिकारशक्तीची गरज असते. हा योग शरिरातील प्रतिकारशक्तीसोबतच फुफ्फुसाच्या क्षमतेत सुधारणा करते. या योगाविषयी अधिक माहितीसाठी 'ईटीव्ही भारत सुखीभव'ने डॉ. जान्हवी कथरानी, फिजियोथेरेपिस्ट यांच्याशी चर्चा केली आहे. डॉ. जान्हवी म्हणतात की, सिंहासन हा प्राचीन योग आहे. सिंहासनाचा उल्लेख घेरंडा संहिता सहित अनेक ग्रंथांमध्ये आढळतात. प्राचीन ग्रंथांमध्ये याला कुंभक म्हणूनही ओळतात.

सिंहासन करण्याची पद्धती -

  • सिंह आसन करण्यासाठी सर्व प्रथम, आपण आपल्या पायाची बोटं एकत्र ठेवून त्यावर बसा
  • अंडकोष अंतर्गत दोन्ही टाच अशा प्रकारे ठेवा की उजवी टाच डावीकडील आणि डावी टाच उजवीकडे आहे आणि वरच्या दिशेने दुमडा
  • पिंडली हाडांचा पुढील भाग जमिनीवर घ्या
  • हातांना देखील जमिनीवर घ्या
  • तोंड उघडे ठेवून होईल तितकी जीभ बाहेर काढा
  • डोळ्यांना पूर्णपणे उघडे ठेवून आभाळाकडे पाहा
  • नाकाद्वारे श्वास घ्या
  • श्वासाला हळूहळू बाहेर सोडत गळ्यातून स्पष्ट आणि स्थिर आवाज काढा

श्वास घेण्याची पद्धत -

डॉ. जान्हवी सांगतात, की सिंह मुद्रेवर बसल्यानंतर संपूर्ण श्वास सोडावा आणि पूर्णक्षमतेने खोल श्वास घ्यावा. हे करत असताना डोळे उघडे हवे. तोंड पूर्णपणे उघडे ठेवून जीभ बाहेर काढावी. हा योग प्रकार प्राणायमध्ये सर्वोकृष्ट आणि लाभदायक मानला जातो. या योगामुळे श्वास घेणे आणि सोडणे या अंतरात वाढ होऊ शकते. कमीत-कमी एका मिनिटात तीन वेळा श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया करावी. हे आसन सकाळी आणि सायंकाळी तीन-तीन वेळा करावे.

सिंहासनाचे फायदे -

  • या आसनाच्या नित्य सरावाने स्मरणशक्ती वाढते.
  • आवाजासंबंधित तक्रारी आणि टॉन्सिल्सना आलेली सूज या आसनाच्या सरावाने नाहीशी होते.
  • या आसनाच्या सरावामुळे थायरॉईड ग्रंथीला चेतना मिळून तिचे कार्य सुरळीत चालते.
  • श्वसनयंत्र आणि स्वरयंत्रावर या आसनामुळे चांगला परिणाम होतो.
  • या आसनामुळे छातीच्या व पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
  • डोळे, कान, व त्वचेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.
  • या आसनामुळे वज्रासनापासून मिळणारे सर्व लाभ प्राप्त होतात.
  • मन एकाग्र करण्यासाठी या आसनाचा नित्य सराव करावा.
  • या आसनामुळे चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो.

...ही काळजी घ्या -

डॉ जान्हवी म्हणतात, साधारणत: कोणतेही आसन रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यानंतर दोन तासांनी करावे. तसेच कोणतेही आसन शिक्षित व्यक्तीकडून किंवा त्यांच्या देखरेखीत करावे. आसनासबंधीचे काही प्रश्न असल्यास तुम्ही jk.swasthya108@gmail.com यावर संपर्क करू शकता.

Last Updated : Jul 9, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.