ETV Bharat / sukhibhava

Skin Care Tips : तुमचा चेहरा देखील काळा दिसू लागला आहे, तर शरीरात असू शकते 'या' जीवनसत्वाची कमतरता - व्हिटॅमिन ई

Skin Care Tips : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते, त्याचप्रमाणे चमकदार त्वचेसाठी पोषण आवश्यक असते. जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल, तर तुमच्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रंग फिकट पडतो.

Skin Care Tips
चेहरा काळा दिसू लागला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 12:50 PM IST

हैदराबाद : सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अशा परिस्थितीत जर कोणी असे म्हटले की तुझा चेहरा इतका निस्तेज का दिसतोय किंवा तू काळा दिसत आहेस, तर लगेच आपला आत्मविश्वास कमी होतो. मग आपण विविध प्रकारचे उपाय अवलंबतो ज्यामुळे आपल्याला फार कमी फायदा होतो आणि आपली निराशा वाढतच जाते. शरीर बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आतूनही निरोगी असणं खूप गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत चेहरा असो की शरीर, दोघांनाही पोषणाची गरज असते.

जीवनसत्त्वाच्या कमतरता : आतून सुंदर दिसण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, हायड्रेशन आणि काही आवश्यक पोषक घटक जसे की मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह इत्यादींची आवश्यकता असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे आपल्या चेहऱ्याचा रंग खराब होतो. जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या अशा समस्या उद्भवतात. इतकंच नाही तर तुम्ही वेळेआधी म्हातारे दिसायलाही सुरुवात होवू शकते. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार करून तुमचं सौंदर्य टिकवून ठेवलं तर बरे होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टींनी तुम्ही व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात करू शकता.

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात कशी करावी

  • स्वतःला हायड्रेटेड ठेवा : त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, स्वतःला हायड्रेट ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्या.याने तुमची त्वचा आतून हायड्रेट राहील आणि नंतर ती काळी दिसणार नाही.
  • शेंगदाणे आणि बदाम व्हिटॅमिन-ई आणि फायबर समृध्द बदाम किंवा शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील या पोषक तत्वाची कमतरता भरून निघते. यासाठी रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खा. हे व्हिटॅमिन ई साठी खूप चांगले पर्याय आहेत.
  • नियमित व्यायाम करा : व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे काळी त्वचा किंवा फ्रिकल्स येण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे रोज व्यायाम करा.
  • हिरव्या पालेभाज्या, बीटरूट आणि पालक : हिरव्या भाज्या अनेक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्या सेवनाने आपल्या शरीराला अंतर्गत पोषण मिळते तसेच त्वचा चमकते. अशा परिस्थितीत पालक आणि बीटरूट आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी व्हिटॅमिन ईचे चांगले स्रोत आहेत.
  • सोयाबीन आणि सूर्यफूल तेल : व्हिटॅमिन-ई आणि फायबर असलेले सोयाबीन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि इतकेच नाही तर सर्व तेलांमध्ये सूर्यफूल तेल आपल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन-ईचा सर्वोत्तम पर्याय आहे.

हेही वाचा :

  1. World Immunization Day 2023 : 'जागतिक लसीकरण दिन' 2023; प्रत्येक वयात आवश्यक लसीकरणाने होते आरोग्याचे रक्षण
  2. World Diabetes Day 2023 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या
  3. Oil For Skin in winter : हिवाळ्यात चेहऱ्यावर लावा 'हे' तेल, तुमच्या त्वचेला येईल नैसर्गिक चमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.