ETV Bharat / sukhibhava

कोविड-19चा विषाणू नष्ट करणारे नवे एअर फिल्टर दाखल - कोरोनासाठी एअर फिल्टर

विषाणूला पकडून ताबडतोब नष्ट करणाऱ्या फिल्टरची रचना झिफेंग रेन यांनी केली आहे. रेन हे विद्यापाठीतील टेक्सास सेंटर फॉर सुपरकंडक्टिव्हिटी येथे संचालक आहेत. यासाठी त्यांनी ह्युस्टन येथील वैद्यकीय स्थावर मालमत्ता विकास कंपनी मेडिस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोंझेर होरानी आणि इतर संशोधकांचे सहकार्य घेतले आहे. गॅल्वेस्टोन राष्ट्रीय प्रयोगशाळेत याबाबत चाचणी घेण्यात आली...

Scientists create nickel foam air filter to 'catch and kill' COVID-19 virus
कोविड-19 चा विषाणू नष्ट करणारे नवे एअर फिल्टर दाखल..
author img

By

Published : Jul 10, 2020, 3:13 PM IST

हैदराबाद - एकीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगात भीतीदायक वातावरण निर्माण केलेले असताना, ह्युस्टन विद्यापीठातील संशोधकांनी असे एक एअर फिल्टर विकसित केले आहे जे कोविड-१९ आजारास कारणीभूत विषाणूस ताबडतोब नष्ट करते.

विषाणूला पकडून ताबडतोब नष्ट करणाऱ्या फिल्टरची रचना झिफेंग रेन यांनी केली आहे. रेन हे विद्यापाठीतील टेक्सास सेंटर फॉर सुपरकंडक्टिव्हिटी येथे संचालक आहेत. यासाठी त्यांनी ह्युस्टन येथील वैद्यकीय स्थावर मालमत्ता विकास कंपनी मेडिस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोंझेर होरानी आणि इतर संशोधकांचे सहकार्य घेतले आहे. गॅल्वेस्टोन राष्ट्रीय प्रयोगशाळेत याबाबत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत संशोधकांना असे आढळून आले की, या फिल्टरमध्ये प्रवेश केल्यानंतर कोविड-१९ आजार होण्यास कारणीभूत असलेला विषाणू 99.8 टक्के प्रमाणात पहिल्याच फेरीत नष्ट झाला. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध असलेला निकेल फोम 392 अंश फॅरनहाईट एवढ्या तापमानावर गरम करुन या फिल्टरची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना झिफेंग रेन म्हणाले, की हे फिल्टर विमानतळे आणि विमाने, कार्यालयीन इमारती, शाळा तसेच जहाजांमध्ये कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरु शकते."

"याची विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्याची क्षमता आपल्या समाजासाठी उपयोगी ठरु शकते. मेडीस्टारचे अधिकारी डेस्कटॉप प्रारुपाचा प्रस्ताव मांडणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आजूबाजूची हवा शुद्ध करण्याची क्षमता असेल", असेही ते म्हणाले. संपुर्ण अमेरिकेत महामारीचा प्रसार होत होता, तेव्हा विषाणूला पकडणाऱ्या एअर फिल्टरची विकसित करण्याकरिता मदत करावी म्हणून मेडिस्टारने 31 मार्च रोजी ह्युस्टन विद्यापिठातील टेक्सास सेंटर फॉर सुपरकंडक्टिव्हिटीकडे प्रस्ताव मांडला, असेही रेन यांनी सांगितले. हा विषाणू हवेत सुमारे 3 तास टिकतो, हे संशोधकांना ठाऊक होते. अशावेळी, तो त्वरित नष्ट करण्यासाठी फिल्टर तयार करण्याची योजना व्यवहार्य होती. उद्योग पुन्हा सुरु होत असताना, वातानुकुलित परिसरांमध्ये प्रसार नियंत्रित करणे निकडीचे होते.

त्याचप्रमाणे, 20 अंश सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू टिकू शकत नाही, हेही मेडिस्टारला माहीत होते. म्हणून, संशोधकांनी तप्त फिल्टर वापरण्याचा निर्णय घेतला.

फिल्टरचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवत, सुमारे 200 अंश सेल्सिअसवर नेऊन, विषाणू त्वरित नष्ट करणे त्यांना शक्य झाले.

रेन यांनी निकेल फोम वापरण्याचा सल्ला दिला. कारण, याद्वारे काही मुख्य निकषांची पुर्तता केली जातेः तो सच्छिद्र असतो, याद्वारे हवा आरपार जाऊ शकते आणि वीजवाहक असतो ज्यामुळे त्याला तापवता येते. तो लवचिकदेखील असतो.

याचा नमुना स्थानिक कार्यशाळेत विकसित करण्यात आले. त्यानंतर रेन यांच्या प्रयोगशाळेत विद्युतदाब/विद्युतप्रवाह आणि तापमानाच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर, विषाणू नष्ट करण्याची क्षमता तपासण्यासाठी तो नमुना गॅल्वेस्टोन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला.

हेही वाचा : कोविड-१९ औषधांच्या विकासात पेशी आवरण आधारित 'चिप'ची भूमिका महत्त्वपूर्ण..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.