ETV Bharat / sukhibhava

Move on tips : लक्षात ठेवा, ब्रेकअप हा जीवनाचा एक भाग आहे, शेवट नाही! - breakups are a part of life not the end

जसे प्रेमात पडलेल्या माणसात अनेक बदल दिसू लागतात, तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. ब्रेकअप सोबत येणारे दु:ख देखील एखाद्याला अस्वस्थ सवयींकडे झुकवते. ब्रेकअपमधून बरे होणे सुरुवातीला कठीण वाटू शकते, परंतु निरोगी जीवनासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे तुटलेले हृदय जोडण्यासाठी करण्यात मदत करण्यासाठी आम्ही येथे 5 टिप्स देत आहोत. (Move on tips, breakups are a part of life not the end )

Move on tips
ब्रेकअप हा जीवनाचा एक भाग आहे, शेवट नाही!
author img

By

Published : Nov 30, 2022, 10:57 AM IST

नवी दिल्ली : जसे प्रेमात पडलेल्या माणसात अनेक बदल दिसू लागतात, तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. कधी सकारात्मक बदल होतात तर कधी नकारात्मक बदल होतात. अनेकांना ब्रेकअप झाल्यावर आयुष्य थांबल्या सारखे वाटू लागते. पण ब्रेकअप झाल्यावर नवीन सुरूवात (new beginning after breakup) करायची असेल तर मग या टिप्स फाॅलो करा. (Move on tips, breakups are a part of life not the end)

सोशल मीडियापासून ब्रेक घ्या : सोशल मीडिया तुमच्यावर भूतकाळातील आठवणींचा भडिमार करू शकतो. तुम्हाला तुमच्या एक्स लवरची स्थिती वारंवार तपासत राहण्याची इच्छा देखील असू शकते. सापळ्यात पडू नका कारण ते तुम्हाला दीर्घकाळापर्यंत वेदना देईल. तुम्हाला भविष्यात पाऊल ठेवण्याऐवजी भूतकाळाला चिकटून राहिल्यासारखे वाटेल. त्यामुळे, या काळात स्वत:ला थोडी जागा देण्यासाठी तुमच्या एक्स लवरचे प्रोफाईल काही काळ अनफॉलो करणे किंवा ब्लॉक करणे उत्तम.

आत्मविश्वासाने पुढे जावे: आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल. सर्वात आधी, तुमचे ब्रेकअप झाले आहे, हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.

अपयश वाटू शकते: आपण प्रेमात काही उगाच पडत नाही. एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो. आपल्या सहवासात सतत असतो. आपणही त्याला मनातले सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नाते तुटते, तेव्हा आपण निराश होतो आणि आपल्याला हे खूप मोठे अपयश वाटू शकते.

स्वतःला दोष देण थांबवा: ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी आहात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही.

प्रॅक्टीकली विचार करा: (Think Practically) ब्रेकअप हे माणसाला प्रॅक्टीकल बनवते. आजवर भावनेत अडकून पडलेला व्यक्ती ब्रेकअप मुळे ताळ्यावर येतो आणि त्याला कळते की कोणात जास्त अडकून राहणे हे आपल्यासाठीच धोकादायक आहे. कारण समोरच्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होत नाही पण आपल्याला खूप त्रास होतो.

लेखणीमध्ये एक मित्र शोधा : लेखणी तलवारीपेक्षा बलवान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना कागदावर मांडायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही स्वतःशी संभाषण करत आहात. हळूहळू, तुमचे हृदय हलके वाटू लागेल.

स्वतःला अधिक एक्सप्लोर करा : तुम्ही आयुष्यातील नवीन अध्यायात प्रवेश करताच, तुम्ही तुमच्या एक्स लवरसोबत अनुसरण केलेला नेहमीचा दिनक्रम बदला. नवीन रेस्टॉरंटमध्ये जा. ज्यात तुम्ही यापूर्वी कधीही गेला नव्हता किंवा खरेदीला जा. तुम्हाला नेहमी हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करा. आकाश ही तुमची मर्यादा आहे, फक्त ती मोडण्याची हिंमत वाढवा. लक्षात ठेवा, ब्रेकअप हा जीवनाचा एक भाग आहे, शेवट नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.