हैदराबाद Relationship Tips : सासू सूनेचं नातं म्हणजे 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं म्हणायला हरकत नाही. खरचं हे नातं इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. या नात्याची मजेशीर गोष्ट म्हणजे सासू सूनांमध्ये घडीभर प्रेम, माया असते तर पुढच्या घडीला कोणत्याही कारणांनी वाद होतात. प्रत्येक मुलीचं नक्कीच हे स्वप्न असतं की, तिला चांगली सासू मिळावी. जुन्या काळातील सासू सुनेच्या नात्यात आणि आजकालच्या सासू सुनेच्या नात्यात चांगलाच बदल दिसून येतो. सध्याच्या सासू-सुनांमध्ये प्रेम, मैत्री आणि जिव्हाळा दिसून येतो. सासू सुनेच्या नात्यात गोडवा आला की या नात्याचं मैत्रीत रुपांतर होतं. हे मैत्रीचं नातं टिकवून ठेवायचं असलं तर काय करावं हे जाणून घ्या.
कधीही सासूला सांगू नका 'या' गोष्टी
नवऱ्यासोबतचे वाद : नवरा बायकोमधलं भांडण तसं तर कधीच कोणाला सांगू नये. त्यातल्या त्यात सासूचं आणि तुमचं मैत्रीचं नात असेल तर कधीही सासूला नवऱ्या सोबतचे वाद सांगू नका. कारण तुमची सासू असण्यासोबत ती तुमच्या नवऱ्याची आई देखील आहे, हे विसरून चालणार नाही. कोणतीच आई आपल्या मुलाविषयी चुकीचं काही ऐकून घेत नाही. त्यामुळं अशावेळी सासू सुनेच्या नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते.
तुमचे जुने प्रेमसंबंध : सासू आणि सुनेच कितीही घट्ट मैत्रीचं नाचं असलं तरी देखील तुमच्या जुन्या प्रेमसंबंधाबद्दल सासूशी कधीच बोलू नका. कोणत्याच सासूला तिच्या सुनेच्या जुन्या प्रेमसंबंधाबद्दल ऐकायला आवडणार नाही. अशा गोष्टी शेअर केल्याने नात्यात दुरावा येवू शकतो.
माहेरी होणारे वाद : प्रत्येक स्त्रीला आपल्या दोन्ही घरांना सांभाळून राहावं लागतं. त्यामुळं माहेरच्या वादांबद्दल सासूला कधीच काही सांगू नका. कारण सासूच्या मनात तुमच्या माहेरच्या लोकांविषयी गैरसमज होऊ शकतात.
आपली आई चांगला स्वयंपाक करते : तुमची आई तुमच्यासाठी जगातील सर्वात चागली स्वयंपाकी असते. परंतु सासूसमोर असे कधीही म्हणू नका. सासूने बनवलेलं जेवण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डायटिंग करत आहात किंवा तुमचा उपवास आहे असं सांगा, असे केल्यानं नातं चांगलं टिकून राहातं.
हेही वाचा :