महाकालीचे निस्सिम भक्त तर स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांना ओळखले जाते. रामकृष्ण परमहंस यांची हिंदू, ख्रिश्चिन, मुस्लिम या धर्मावर सारखीच श्रद्धा होती. मात्र जन्म फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला झाला. यावर्षी रामकृष्ण परमहंसांचे अनुयायी 21 फेब्रुवारी रोजी त्यांची 187 वी जयंती साजरी करत आहेत.
गदाधर चटोपाध्याय कसे झाले रामकृष्ण परमहंस : गदाधर चट्टोपाध्याय हे रामकृष्ण परमहंस यांचे बालपणीचे नाव होते. तारखेनुसार त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी बंगाल प्रांतातील कमरपुकुर गावातील एका गरीब ब्राह्मणाच्या कुटुंबात झाला. भारतीय पंचांगानुसार हा दिवस फाल्गुन शुक्ल द्वितीया असा गणला जातो. त्यांमुळे त्यांचे अनुयायी त्यांची जयंती तिथीनुसार या वर्षी 21 फेब्रुवारीला साजरी करत आहेत. गदाधर यांच्या वडिलांचे नाव खुदीराम आणि आईचे नाव चंद्रमणी देवी होते. गदाधर यांना पंजाबमधील तोतापुरीच्या त्यांच्या वेदांतिक गुरूंनी परमहंस ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे त्यांचे नाव परमहंस रामकृष्ण हे प्रचलित झाले.
स्वामी विवेकानंदाचे गुरू : स्वामी विवेकानंद हे आपल्या आध्यात्मीक ज्ञानासाठी जगभरात ओळखले जात होते. असा महान अध्यात्मीक तत्वज्ञानी महापुरुषांचे गुरू म्हणून रामकृष्ण परमहंस हे ओळखले जातात. रामकृष्ण परमहंस यांच्या मारगदर्शनाखालीच स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्माची साधना केली होती. रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. स्वामी विवेकानंद हे त्यापैकीच एक होते. रामकृष्ण परमहंस यांची महाकालीवर प्रचंड भक्ती होती. त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या कठोर परिश्रमाने इतर धर्मांबद्दलही ज्ञान मिळवले होते. त्यांनी सर्वधर्म समभाव ही भावना वृंद्धीगत केली. रामकृष्ण परमहंस यांचे वयाच्या 50 व्या वर्षी 16 ऑगस्ट 1886 रोजी कोलकाता येथे निधन झाले.
रामकृष्ण मिशनची स्थापना : विवेकानंदांच्या कुतूहलामुळे ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेटले. गुरु-शिष्याचे नाते खूप पवित्र आणि अलौकिक असते, म्हणूनच आज जग दोघांचे नाव घेते. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस या गुरु-शिष्याचे नाते जगासाठी प्रेरणादायी आहे. रामकृष्ण परमहंसांच्या सर्वात आवडत्या शिष्यांपैकी एक असलेल्या स्वामी विवेकानंदानी आपल्या गुरूंच्या शिकवणीचा प्रचार करण्यासाठी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. त्याचे मुख्यालय बेलूर येथे रामकृष्ण आश्रम आहे. लोकांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करणे हे मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतच स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली आहे.
हेही वाचा - Mahashivratri 2023 : हरहर महादेव...महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी