ETV Bharat / sukhibhava

Mental Health Importance- शारीरिक आरोग्यासोबतच ‘मानसिक आरोग्यही’ महत्वाचे, घ्या 'अशी' काळजी

नियमित व्यायामाने (Daily Exercise) अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी (Healthy) ठेवण्यास मदत होते. व्यायामाने शारीरिकच (physical health) नव्हे तर मानसिक आरोग्यही (mental health) उत्तम राहते.

‘मानसिक आरोग्यही’ महत्वाचे
Mental Health Importance
author img

By

Published : Oct 19, 2022, 5:20 PM IST

नियमित व्यायाम केल्याचे अनेक फायदे आहेत जसेकी, तुमच्या आरोग्याचा धोका कमी होतो, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात. अधिक काळ जगण्याची शक्यता वाढते. दैनंदिन जीवनात काम करण्याची क्षमता सुधारते. तुमची त्वचा (Skin) सुंदर दिसेल. व्यायामाने शारीरिकच (physical health) नव्हे तर मानसिक आरोग्यही (mental health) उत्तम राहते. माणसाला नवीन उर्जा (Energy Increses) प्राप्त होते. अपरिहार्य परस्थितीत व्यायाम करणे शक्य नसल्यास, व्यक्ती सुदृढ झाल्यावर व्यायाम करु शकतो. कर्करोगा सारख्या अनेक आजारात रूग्णांसाठी (Cancer patients) व्यायामाचा फायदा मोठ्या प्रमाणावर मान्य केला गेला आहे.

मानसिक आरोग्य स्थिर बाब नाही : उत्तम स्वास्थ्य (Good Health) लाभावे यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. बऱ्याचदा एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की, आपल्याला वाटते- आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. हे जरी खरे असले, तरीही मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. वेगवेगळ्या कारणांनी त्यात नियमित बदल होत राहतात. नियमित व्यायामामध्ये श्वासाचे व्यायाम, एरोबिक्स (Aerobics) आणि ताणण्याचे व्यायाम यांचा समावेश असावा. प्रत्येक मानसिक प्रक्रियेचे काहीतरी प्रयोजन व कार्य असून, मानसिक जीवन आणि वर्तन हे व्यक्तीच्या सक्रियरीत्या जुळवून घेण्याशी निगडित आहे, असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विलियम जेम्स यांचे मानणे होते.

मानसिक आरोग्य : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येप्रमाणे ‘आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर त्याजोडीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची पूर्णस्वरूप स्थिती असणे होय.’ मानसशास्त्रांतर्गत निरनिराळ्या विचारधारांप्रमाणे- मन, मानसिकता आणि ‘विचार-भावना-वर्तन’ या त्रिसूत्रीकडे पाहण्याचे दृष्टिकोन ‘मानसिक आरोग्य’ ही संकल्पना समजून घेण्यास उपयुक्त ठरतात.

नेहमी सकारात्मक विचार करा: मानसिक आरोग्य ठीक नसल्यास चिडचिडेपणा, झोप न लागणे, सतत भीती वाटणे, कोणत्यातरी गोष्टीचा सतत फोबिया असणे असे प्रकार वाढले असून, त्यातून काही जणांच्या मनात टोकाचे पाऊल म्हणून आत्महत्येचे विचार येणे आणि दुर्दैवाने तशा काही घटनादेखील घडत आहेत. नेहमी सकारात्मक विचार करून आपले दैनंदिन जीवन विधायक कामात गुंतवून ठेवा कारण शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.