हैदराबाद : Oats side effects नाश्त्यात ओटस् खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आपण अनेकदा ऐकतो. यामुळं पोटही भरतं आणि आपल्याला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते. असं मानलं जातं की पाण्याऐवजी दुधात शिजवलेले ओटस् खाल्ल्यानं आपल्याला प्रोटीन देखील मिळतं. हे सहज पचतात आणि त्यात अनेक प्रकारचं पोषक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बाजारात विकल्या जाणार्या बहुतेक पॅकेटमध्ये आधीच साखर किंवा सोडियम असतं, म्हणून ते खरेदी करताना लक्ष द्या. जर तुम्हाला 'ग्लूटेन फ्री' फूड खाण्याची सवय असेल तर ओटस् तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. कारण त्यात ग्लूटेन आढळत नाही. रोज नाश्त्यात ओटस् खाण्याची सवय लावल्यानं तुमचं आरोग्य चांगलं राहतं.
ओटस् म्हणजे काय? ओटस् ही धान्याची एक प्रजाती आहे जी त्याच्या बियांसाठी ओळखली जाते. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि अनेक पोषक तत्त्वांमुळे नाश्त्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. यामध्ये आढळणारं फायबर पाण्यात विरघळणारं असतं. हे सहज पचतं म्हणून ते नाश्त्यासाठी चांगलं मानलं जातं. गेल्या काही दशकांपासून ते फक्त मानव खात आहे. एकेकाळी कच्च्या ओटसची पिके फक्त प्राणीच खात होती. पण नंतर त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करून मानवांसाठी खाण्यायोग्य बनवलं गेलं आणि बाजारात विकलं जाऊ लागलं. खाण्यायोग्य ओटस् बाजारात विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळं ते खरेदी करताना लक्ष द्यावं.
ओटस् खाण्याचे दुष्परिणाम :
- ओटस् आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात, परंतु त्याचं सेवन पूर्णपणे सुरक्षित मानलं जात नाही. ओटस् खाण्याचेही तोटे आहेत. जास्त सेवन केल्यानं अनेक समस्या उद्भवू शकतात.
- ओट्सच्या काही जातींमध्ये कृत्रिम पदार्थ आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, जे सेवन केल्यास मधुमेहाची समस्या वाढू शकते.
- दलिया नीट न शिजवल्याने किंवा अर्धवट शिजवून खाल्ल्याने आतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्तीला बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.
- ओट्समध्ये असलेल्या फॅटी ऍसिडचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी चांगलं नाही. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यातील पोषक तत्त्व आतड्यांद्वारे योग्यरित्या शोषले जात नाहीत. यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते.
- कमी पोषक तत्वे असलेल्या ओट्सच्या अतिसेवनामुळे झोपेची समस्या, हाडे दुखणे, स्नायू कमकुवत होणे, चिंता, मोतीबिंदू, नखांची कमी वाढ, थकवा आणि मायग्रेन यांसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
- ओट्समध्ये ग्लूटेन आढळत नाही. परंतु गहू, बार्ली यांसारख्या धान्यांसोबत ओटस् हे शेतात पिकवले जात असल्याने त्यांच्यावरही ग्लूटेनचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तसेच ग्लूटेनयुक्त ओटस् खाल्ल्याने जुलाब, पेटके, त्वचा रोग, पाठ व सांधेदुखी, अंतःस्रावी विकार अशा समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा :