उस्मानाबाद : कोविडचा नवीन बीएफ 7 हा व्हेरियट (new variant of BF 7) लस घेऊन सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. परंतु हा सिव्हीयर नाही, हा माइल्ड आहे. याच्या खूप केसेस होतील, परंतु दवाखान्यात ऍडमिट करावे लागणार नाही. त्यामुळे शासनाने आणि नागरिकांनी घाबरून न जाता उपाययोजना करणे गरजेचे (Citizens should not panic and take measures) आहे तसेच काळजी घेणे गरजेचे आहे. (new variant of BF 7 is threat to the country)
लॉकडाऊन लावण्याची गरज नाही : मायक्रोबॉयलॉजी सोसायटी इंडियाचे अध्यक्ष संशोधक डॉ अरविंद देशमुख म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे लागणार आहे, परंतु लॉकडाऊन त्यावरचा उपाय नाही. लॉकडाऊन व्हावे अशी लोकांची मानसिकता नाही. चीनचा लॉकडाऊन लोकांनी हाणून पाडला. तीच अवस्था भारतातदेखील होण्याची शक्यता आहे. भारतात कोणीही लॉकडाऊन स्विकारणार नाही, त्यामुळे भारतात लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचे डॉ अरविंद देशमुख यांनी सांगितले. भारतीयांनी लस घेऊन एक वर्ष झाले आहे, त्यामुळे लसीचा प्रभाव कमी झाला असून आपली प्रतिकार शक्तीही कमकुवत झाली आहे. त्यामुळे लसीचा एक डोस पुन्हा घेणे गरजेचे आहे. यावरची लस सुधारित काढणेही गरजेचे आहे.
शासनाने युद्ध पातळीवर ताबडतोब कर्मचारी भरले पाहिजेत : डॉ अरविंद देशमुख म्हणतात, झिरो सिक्वेन्सीग करायला पाहिजे, पण त्यासाठी राज्यात यंत्रणा दिसत नाही. सगळ्या लेबाॅरेटरीज बंद पडल्या आहेत. यात काम करणारे सगळे कर्मचारी काढून टाकले आहेत. या कामासाठी कर्मचारी नाहीत, त्यामुळे झिरो सिकव्हेंसीग होणे शक्य नाही. यासाठी किमान एक महिना लागणार आहे, त्यामुळे शासनाने युद्ध पातळीवर ताबडतोब कर्मचारी भरले पाहिजेत आणि इथून पुढे पाचवर्षं हे कर्मचारी कमी करु नयेत असेही डॉ अरविंद देशमुख यांनी सांगितले.