ETV Bharat / sukhibhava

Navratri 2023 Sabudana Benefits : या नवरात्रीत करा साबुदाण्याचा उपवासाच्या पदार्थात समावेश; जाणून घ्या दूध आणि साबुदाणा खाण्याचे फायदे - देवीच्या नऊ रूपांची पूजा

Navratri 2023 Sabudana Benefits : 'शारदीय नवरात्री'ला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. साबुदाणा हा उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. दूध आणि साबुदाणा खाण्याचे फायदे घ्या जाणून.

Navratri 2023 Sabudana Benefits
साबुदाण्याचा उपवासाच्या पदार्थात समावेश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 12:44 PM IST

हैदराबाद : Navratri 2023 Sabudana Benefits साबुदाणा हा उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. साबुदाण्यापासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अनेक लोक हे नऊ दिवस उपवास करतात. काहीजण फळं खाऊन आणि तर काहीजण एकवेळ पाणी पिऊन उपवास करतात. जर तुम्हीही नवरात्रीचं व्रत पाळत असाल तर साबुदाण्याचा आहारात समावेश करा. साबुदाणा प्रथिने आणि पौष्टिकतेने समृद्ध आहे. साबुदाणा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहण्यास मदत होते. साबुदाण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असाल तर अशा प्रकारे साबुदाणा खा.

दूध आणि साबुदाणा खाण्याचे फायदे :

  • वजन वाढणे : नवरात्रीत नऊ दिवस उपवास केल्याने तुम्ही अशक्त आणि बारीक होऊ शकता. जर तुम्ही आधीच बारीक आणि अशक्त असाल तर तुमच्या आहारात दूध आणि साबुदाणा यांचा समावेश करा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते.
  • एनर्जी : साबुदाणा आणि दूध या दोन्हीमध्ये प्रथिने, कर्बोदके आणि ऊर्जा असते. उपवासाच्या वेळी तुम्ही साबुदाणा आणि दुधाचे सेवन करू शकता ज्यामुळे शरीर दिवसभर एनर्जेटिक राहते. यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.
  • रक्तातील साखर : रक्तातील साखरेच्या रुग्णांसाठी साबुदाणा आणि दुधाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. मधुमेही रुग्ण उपवासात कमी फॅट दुधासोबत साबुदाणा खाऊ शकता.
  • हाडांसाठी फायदेशीर : दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो. जर तुम्ही कमकुवत हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर दुधासोबत साबुदाणा खाऊ शकता. यामुळे केवळ हाडंच नव्हे तर शरीरही मजबूत होण्यास मदत होते.
  • रक्ताभिसरणासाठी उपयुक्त : साबुदाणामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येते. जर तुम्ही अ‍ॅनिमियाचे शिकार असाल तर साबुदाणाला तुमच्या आहाराचा एक भाग नक्की बनवा.
  • प्रथिनांचा समृद्ध स्रोत : त्यात प्रथिने पुरेशा प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. प्रोटीनयुक्त आहारासाठी तुम्ही तुमच्या आहारात साबुदाणा समाविष्ट करू शकता.

हेही वाचा :

  1. Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस; 'ही' आहेत माता दुर्गेची नऊ रूपे...
  2. Navratri 2023 Day 1 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा देवी शैलपुत्रीची उपासना; जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि रंग
  3. Navratri 2023 Day 2 : नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'ब्रह्मचारिणी' देवीची केली जाते पूजा; जाणून घ्या काय आहे आजचा रंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.