ETV Bharat / sukhibhava

Navratri 2023 : उपवासात होऊ शकतो गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास; करा हे उपाय

Navratri 2023 : नवरात्रीत अनेक लोक ९ दिवस उपवास करतात. अशा परिस्थितीत कधीकधी गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या तुम्हाला सतावू शकतात. तुम्ही या टिप्सचा अवलंब करून त्यावर मात करू शकता.

Navratri 2023
गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 2:42 PM IST

हैदराबाद : Navratri 2023 शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अनेक लोक हे नऊ दिवस उपवास करतात. काहीजण फळं खाऊन आणि तर काहीजण एकवेळ पाणी पिऊन उपवास करतात. जर तुम्हीही नवरात्रीचं व्रत पाळत असाल तर खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानं तुमच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.

अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्या : नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यास गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या तुम्हाला सतावू शकते. खाण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल तसेच मिरची मसाला आणि कांदा-लसूण न खाल्ल्याने तुमच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि अनेक समस्या निर्माण होतात. जसे अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्या. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येईल. तसेच उपवासाच्या वेळी तुम्ही एक गोष्ट सतत करत राहिल्यास या समस्येपासून तुम्ही वाचू शकता.

उपवास दरम्यान गॅस आणि ऍसिडिटी टाळण्यासाठी उपाय :

  • उपवास करताना सकाळी नारळ पाणी घ्या : उपवासाच्या वेळी सकाळी नारळपाणी घेतल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून बचाव होतो. नारळाचे पाणी तुमच्या पोटातील आम्लयुक्त पीएच संतुलित ठेवण्यास मदत करते. याशिवाय भरपूर पाणी असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते, त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही. या व्यतिरिक्त ते बद्धकोष्ठता देखील प्रतिबंधित करते ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटी देखील होऊ शकते.
  • जास्त चहा आणि कॉफी पिऊ नका : काही लोक उपवासात चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ लागते. वास्तविक, कॅटेचिन अम्लीय पित्त रस वाढवते ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उपवासाच्या वेळीही चहा-कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवा आणि दिवसातून दोनदाच घ्या.
  • दिवसाच्या सुरुवातीला ही एक गोष्ट करा : गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीला काही पुदिन्याची पाने चावून खा. हे खाल्ल्याने तुमचा उपवास मोडणार नाही आणि तुम्हाला अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्याही होणार नाही. असे केल्याने तुमचे पोट थंड होण्यासोबतच या समस्यांपासून वाचेल.

हेही वाचा :

  1. Navratri 2023 : तुम्ही गरबा, दांडिया फक्त आनंदासाठी करता का? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...
  2. Navratri 2023 Sabudana Benefits : या नवरात्रीत करा साबुदाण्याचा उपवासाच्या पदार्थात समावेश; जाणून घ्या दूध आणि साबुदाणा खाण्याचे फायदे
  3. Navratri 2023 : नवरात्री म्हणताच आठवतात 'गरबा' आणि 'दांडिया'; जाणून घ्या काय आहे दोघांमधील नेमका फरक..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.