हैदराबाद : पाळीव प्राणी मानवाच्या जीवनात फार महत्वाची भूमीका बजावतात. आपले पाळीव प्राणी आपला कधीच विश्वासघात करत नाहीत. त्यामुळे ते घरातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्या मालकांवर प्रेम करतात. त्यांच्या सुखादुखाचे सोबती होतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांवर घरातील सगळ्यांचाच मोठा जीव जडतो. आपल्या पाळीव प्राण्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी 11 एप्रिल हा राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया काय आहे पाळीव प्राण्यांचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यामागील इतिहास.
राष्ट्रीय पाळीव प्राणी दिनाचा इतिहास : पाळीव प्राणी आपल्या जीवनात आनंद घेऊन येतात. आपल्या सगळ्या आनंदात आपले पाळीव प्राणी सहभागी होतात. त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय पाळीवर प्राणी दिवस साजरा करण्यात येतो. फक्त आपले पाळीव प्राणीच नाही, तर रस्त्यावर असलेल्या भुकेल्या प्राण्यांबाबतही जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस साजरा करण्यात येतो. अनेक प्राणी रस्त्यावर भुकेले असतात. त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवशी जनजागृती करण्यात येते. यासाठी अमेरिकेत हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पाळीव प्राण्यांबाबत प्रेम व्यक्त करण्यासाठी 2006 मध्ये कॉलीन पेजने राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून हा दिवस अमेरिकेसह इतर देशातही साजरा करण्यात येतो.
काय आहे राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवसाचे महत्व : पाळीव प्राण्यांना आपल्या मालकांच्या विषयी अपार प्रेम असते. आपल्या मालकांना पाहून आपले पाळीव प्राणी ते प्रेम व्यक्त करतात. पाळीव प्राण्यांमुळे मानवाचे मानसिक आरोग्य सुधारत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे आपल्या घरातील पाळीव प्राणी आपल्याला मोठे लाभदायक ठरत असल्याचे दिसून येते. प्राण्यांनी आपल्या मालकांचा जीव वाचवल्याचा अनेक घटना आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे.
पाळीव प्राण्यांची शेतकऱ्यांना होते मदत : ग्रामीण भागात कुत्रा शेत राखणात शेतकऱ्यांना मोठी मदत करतो. काही ठिकाणी तर शेतीसह घराच्या राखणाची सगळी जबाबदारी कुत्र्यांवर असते. हल्ली शहरी भागात कुत्र्यांसह मांजर पाळण्यात येते. कुटूंबाप्रती अपार प्रेम असल्याने या दोन्ही पाळीव प्राण्यांना पाळण्याकडे नागरिकांचा कल असतो. दुसरीकडे पाळीव प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. गाय, बैल शेतकऱ्यांच्या उपयोगी पडतात. आपली दुधाची गरज पूर्ण होते. त्यामुळे पाळीव प्राण्यांचा मानवाला मोठा फायदा होतो.
हेही वाचा - World Homeopathy Day 2023 : होमिओपॅथीत शोधले जाते आजाराचे मूळ, मग दुर्धर आजारावर करण्यात येतो उपचार