ETV Bharat / sukhibhava

Mobile Phone Complete 50 Years : मोबाईल फोन झाला 50 वर्षाचा; जाणून घ्या काय आहे मोबाईल फोनचा इतिहास - मोबाईलचा इतिहास

अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी 1876 ला टेलिफोनचा शोध लावला होता. त्यानंतर मोबाईलचा शोध लावण्यासाठीही बेल लॅबोरेटरीजकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र मोटोरोला कंपनीतील अभियंता कुपर मार्टीन यांनी मोबाईलचा शोध लावला. त्यांनी या मोबाईलवरुन पहिला कॉल 3 एप्रिल 1973 ला केला होता.

Mobile Phone Complete 50 Years
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 5, 2023, 2:12 PM IST

हैदराबाद : विज्ञानामुळे जग जवळ आले, असे बोलले जाते. मात्र मोबाईलमुळे जग खिशात आल्याची अनुभूती सगळ्यांना येत आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय आज मानवाच्या आयुष्याची कल्पनाही करता येऊ शकत नाही. अनेक जणांनी तर पालकांनी मोबाईल फोन न दिल्याने आपले आयुष्य संपवल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यावरुन आपल्या आयुष्यात मोबाईलला किती महत्व प्राप्त झाले आहे, त्याचा अंदाज लाऊ शकतो. त्यामुळे मोबाईलचा नेमका काय आहे इतिहास याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ.

कोणी लावला मोबाईलचा शोध : मोबाईलचा शोध लागल्यानंतर जग जवळ आल्याचे बोलले जात असले, तरी मोबाईलचा शोध लावल्याचा मोठा रंजक इतिहास आहे. मोटोरोला कंपनीतील कार्यरत असलेल्या अभियंता मार्टीन कुपर यांनी मोबाईलचा शोध लावला आहे. मार्टीन कुपर यांनी शोध लावलेल्या मोबाईलवरुन जगातील पहिला कॉल 3 एप्रिल 1973 ला केला होता. त्यामुळे मार्टीन कुपर यांना मोबाईलचे जनक असे म्हटले जाते.

कारफोनचा लागला शोध : दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठी स्पर्धा सुरू झाली होती. फोन करण्याचे उपकरण सोबत नेता येईल, याबाबतचा शोध सगळ्या कंपनीकडून सुरू होता. मात्र यात यश येत नव्हते. टेलिफोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी यासाठी चांगलेच प्रयत्न सुरू केले होते. अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी 1876 ला टेलिफोनचा शोध लावला होता. त्यानंतर मोबाईल फोनच्या शोधातही ते प्रयत्न करत होते. यात बेल यांच्या बेल लॅबोरेटरीजला यशही आले होते. त्यांनी कारमध्ये फोनची निर्मिती केली. मात्र हे उपकरण खूप महागडे असल्याने ते प्रचलित झाले नाही.

प्रतिस्पर्धकाला लावला फोन : दुसरीकडे मोटोरोला कंपनीत कार्यरत असलेल्या मार्टीन कुपर यांनी तब्बल तीन महिने अथक परिश्रम घेऊन मोबाईलचा शोध लावला. मात्र शोध लावल्यानंतर त्यांनी त्याचे प्रात्याक्षिक करण्यासाठी सगळ्या पत्रकारांना न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन रोडवर बोलावले. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या बेल लॅबोरेटरीजच्या अभियंता असलेल्या जोएल एंगल यांना फोन केला. यावेळी कुपर यांनी एंगल यांना आपण फोनवरुन बोलत असल्याचे सांगितल्याने त्यांना धक्काच बसला. या सगळ्या नाटकीय घटनांचे पत्रकारांकडून रेकॉर्डींग सुरू होती. त्यामुळे त्याबाबतची माहिती व्हिडिओथ चित्रित करण्यात आलेली आहे. जगातील पहिला कॉल करण्यात आल्याच्या घटनेला आता 50 वर्ष झाली आहेत.

हेही वाचा - Apple layoffs 2023 : मेटानंतर आता अ‍ॅप्पलही देणार कर्मचाऱ्यांना नारळ; किरकोळ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.