ETV Bharat / sukhibhava

Aloo Gobi Recipe : 'अशी' बनवा बटाटा आणि कोबीची चवदार भाजी, जाणून घ्या रेसिपी

author img

By

Published : Nov 16, 2022, 5:22 PM IST

हिवाळ्यात मिळणारी कोबी ही अशी भाजी आहे, जी बहुतेकांना आवडते. जर तुम्हाला बटाटा-कोबीची कोरडी भाजी बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला चटपटीत भाजी बनवण्याची आणखी एक पद्धत सांगत आहोत. अशाप्रकारे भाजी पटकन शिजतेच पण चविष्ट देखील होते. चला तर बटाटा कोबीची रेसिपी जाणून घेऊया- (Batata Gobhi Dry Bhaji Recipe)

Aloo Gobi Recipe
बटाटा आणि कोबीची चवदार भाजी

हैदराबाद: बटाटा-कोबीची (Batata Gobhi) भाजी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. बटाटा - कोबी ही अशी भाजी आहे, जी बहुतेकांना आवडते. पण जर तुम्हाला बटाटा-कोबीची सुकी भाजी बनवायची असेल, तर आम्ही तुम्हाला चटपटीत भाजी बनवण्याची आणखी एक पद्धत सांगत आहोत. अशा प्रकारे भाजी फक्त पटकन शिजत नाही तर टेस्टी देखील होते. अनेक वेळा आपण कोबी खायला कंटाळा करतो. जेवणात बटाटा कोबीची ही सुकी भाजी बनवा, आवडीने खाल. चला तर जाणून घेऊया भाजी बनवायला लागणारे साहित्य आणि कृती. (Batata Gobhi Dry Bhaji Recipe) (delicious potato and cauliflower vegetable)

भाजी बनवायला लागणारे साहित्य: (Ingredients for cooking vegetables) फुलकोबी, बटाटा, गरम मसाला, तेल, हिंग, जिरे, मीठ, हळद, लाल मिरची, कांदा, तमालपत्र, टोमॅटो, धनेपूड, कोथिंबिर, लसूण, आले, हिरवी मिरची पेस्ट.

कृती: प्रथम कोबी आणि बटाटे धुवून घ्या. नंतर बटाटा आणि कोबीचे तुकडे मध्यम आकारात कापायचे आहेत. यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात बटाटे आणि कोबी तळून घ्या. दोन्ही एकाच वेळी तळू नका, परंतु आळीपाळीने बाहेर काढा. यानंतर त्याच कढईत तेल टाका. आता त्यात जिरे, हिंग आणि तमालपत्र टाकून मंद आचेवर परतून घ्या.

आता यानंतर तुम्हाला बारीक चिरलेला कांदा घालावा लागेल. नीट तळून घ्या. आता त्यात लसूण, आले, हिरवी मिरची पेस्ट घाला. ते पण चांगले तळून घ्या. आता तुम्हाला टोमॅटो बारीक करून त्यात घालायचे आहेत. टोमॅटो चांगले तळून घ्या. लक्षात ठेवा तुम्हाला भाजी मध्यम आचेवर भाजायची आहे. यानंतर गरम मसाला, धनेपूड, हळद, तिखट आणि मीठ घालून परतून घ्या.

शेवटी बटाटे आणि फ्लॉवर घाला. आता थोडे पाणी टाकून झाकून ठेवा. तुमची भाजी काही वेळात तयार होईल. हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. तुमची मसालेदार बटाटा कोबीची भाजी (delicious vegetable) तयार आहे. चपाती किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.