ETV Bharat / sukhibhava

Maharana Pratap Jayanti 2023 : रणांगणात महाराणा प्रताप, दुश्मनांचा उडत होता थरकाप, जाणून घ्या महाराणा प्रताप यांचा इतिहास

महाराणा प्रताप यांना दिल्लीच्या बादशहा अकबराने तब्बल चार वेळा शांतीदूत पाठवून मांडलिकत्व स्विकारण्याचे आवाहन केले. मात्र महाराणा प्रताप यांनी कधीही बादशहाचा प्रस्ताव स्विकारणार नसल्याची शपथ घेतली होती.

Maharana Pratap Jayanti 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 2, 2023, 3:13 PM IST

हैदराबाद : महाराणा प्रताप हे थोर भारतीय लढाऊ योद्धा होऊन गेले आहेत. त्यांच्या शौर्याचा प्रताप इतका जबरदस्त होता, की महाराणा प्रताप रणांगणांत असल्यानंतर दुश्मन चळाचळा कापत असायचे. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये राजपूत सिसोदिया वंशात झाला. मात्र त्यांची जयंती हिंदू कॅलेंडरप्रमाणे साजरी करण्यात येते. महाराणा प्रताप यांचा जन्म हिंदू कॅलेंडरप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल तृतीयेच्या दिवशी झाला आहे.

महाराणा प्रताप यांचे कुटुंब : महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव महाराणा उदय सिंह आणि आईचे नाव जीवन कंवर असे होते. महाराणा प्रताप हे राणा संगाचे नातू होते. महाराणा प्रताप यांना लहानपणी सर्वजण कीका नावाने हाक मारत होते. राजपुताना राज्यांमध्ये मेवाडचे एक विशेष स्थान असून यामध्ये मेवाडला मोठा ऐतिहासिक गौरव प्राप्त झाला आहे. बाप्पा रावल, खुमान पहिला, महाराणा हमीर, महाराणा कुंभ, महाराणा संगा, उदय सिंह आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा मेवाडच्या राजघराण्यात जन्म झाला आहे.

दिल्लीचा बादशहा आणि महाराणा प्रताप : महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळात दिल्लीत मुघल सम्राट अकबराचे राज्य होते. अकबराला भारतातील सर्व राज्यांना अंकित करून मुघल साम्राज्याची स्थापना करायची होती. अकबरला संपूर्ण भारतावर इस्लामी ध्वज फडकवायचे मनसुबे होते. 30 वर्षे सतत प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी अकबराची अधिनता स्वीकारली नाही. त्यामुळे दिल्लीचा बादशहा महाराणा प्रताप यांच्यावर मोठा क्रोधित होता. महाराणा प्रताप यांनी शपथ घेऊन अकबरांना कधीही त्यांचा बादशहा मानणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र तरीही अकबराने महाराणा प्रताप यांना समजवण्यासाठी चार वेळा शांतीदूत पाठवून प्रयत्न केला. मात्र महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव नाकारला होता.

महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक : महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक हा इतिहासात मोठा चर्चेत होता. महाराणा प्रताप यांचा चेतक हा घोडा जगातील सगळ्यात श्रेष्ठ घोडा असल्याचे बोलले जाते. महाराणा प्रताप 72 किलोचे कवच आणि 81 किलोचा भाला वापरत होते. इतके वजन घेऊन महाराणा प्रताप हे चेतक घोड्यावरुन तब्बल 208 किलोच्या वजनासह रणांगणात उतरत होते. मात्र तरीही त्यांच्या चेतक या घोड्याने त्यांना कधीही दगा दिला नव्हता.

महाराणा प्रताप यांचे राज्य आणि राजकारण : महाराणा प्रताप हे मेवाडचे ज्येष्ठ पूत्र होते. मात्र उदयसिंह यांनी त्यांच्या पत्नीच्या आग्रहामुळे जगमलला राजगादीवर बसवले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. दुसरीकडे मेवाडचे नागरिक महाराणा प्रताप यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे. त्यामुळे मेवाडच्या सरदारांनी उठाव करत 1 मार्च 1576 ला महाराणा प्रताप यांना गादीवर बसवले. त्यामुळे गजमल रागावून अकबराला जाऊन मिळाला. मात्र तरीही अकबराला महाराणा प्रताप यांच्यावर विजय मिळवता आला नाही. उलट महाराणा प्रताप यांनी अनेकदा अकबराच्या सैन्याला धूळ चारली आहे. अकबराच्या सैन्याने उदयपूरवर ताबा मिळवल्यानंतर महाराणा प्रताप यांनी जंगलात आश्रय घेतला, मात्र अकबराचा धर्म स्विकारला नाही. मात्र जंगलात शिकारीदरम्यान झालेल्या जखमांमुळे 1597 मध्ये महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला. महाराणा प्रताप यांचा इतिहास कधीही पुसता येणार नाही. महाराणा प्रताप यांची 9 मे रोजी जयंती आहे, त्यानिमित्त महाराणा प्रताप यांना ईटीव्ही भारतकडून विनम्र अभिवादन

हेही वाचा - Sankashti Chaturthi 2023 : काय आहे संकष्टी चतुर्थीचे महत्व; का साजरी करण्यात येते संकष्टी चतुर्थी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.