ETV Bharat / sukhibhava

जाणून घ्या का साजरा केला जातो 'ऑटिस्टिक प्राइड डे'

जगभरात 18 जून रोजी 'ऑटिस्टिक प्राइड डे' साजरा केला जातो. ऑटिझमग्रस्त बालके ही रोगी नसून ते दिव्यांग आहेत, हा संदेश देण्यासाठी या दिवस साजरा करण्यात येतो. ऑटिझमग्रस्त बालके उत्कृष्ट कलाकार, कॉम्प्यूटर एक्स्पर्ट आणि गणितात अत्यंत हुशार असू शकतात. ऑटिस्टिक प्राइड डे पहिल्यांदा 2005मध्ये एका ऑनलाइन समुदायाने साजरा केला होता.

Autistic Pride Day
Autistic Pride Day
author img

By

Published : Jun 22, 2021, 1:22 PM IST

जगभरात 18 जून रोजी 'ऑटिस्टिक प्राइड डे' साजरा केला जातो. ऑटिझमग्रस्त बालके ही रोगी नसून ते दिव्यांग आहेत, हा संदेश देण्यासाठी या दिवस साजरा करण्यात येतो. ऑटिझमग्रस्त बालके उत्कृष्ट कलाकार, कॉम्प्यूटर एक्स्पर्ट आणि गणितात अत्यंत हुशार असू शकतात. ऑटिस्टिक प्राइड डे पहिल्यांदा 2005मध्ये एका ऑनलाइन समुदायाने साजरा केला होता.

ऑटिस्टिक बालकांसाठी फायदेशीर ठरते प्ले थेरेपी

ऑटिस्टिक प्राईड (गर्व) डे..

ऑटिस्टिक बालके दुसऱ्यांशी संवाद साधण्यात आणि प्रतिक्रिया देण्यास सक्षम नसतात. त्यांचा व्यवहार सामान्य लोकांपेक्षा वेगळा असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 160 बालकांपैकी एक ऑटिस्टिक असतात. त्यापैकी 40 % ऑटिस्टिक बालक बोलण्यास सक्षम नसतात.

ऑटिज्म म्हणजेच ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल समस्या आहे. ही त्या व्यक्तिचे आरोग्य आणि हालचालींना प्रभावित करते. या आजाराची लक्षणं बालकांमध्ये सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत दिसतात. मुलं लहान असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवल्यास ऑटिझमच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. ऑटिझमवर विशेष उपचार नाही. मात्र, काही थेरेपीच्या माध्यमातून आरोग्य तज्ज्ञ बालकांची मदत करू शकतात. त्यापैकी एक म्हणजे प्ले थेरेपी.

ऑटिस्टिक प्राईड डेच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत सुखी भव'ने साइकोलॉजिस्ट, माइंडसाइट, माइंडआर्ट अँड कॉफी कन्वर्सेशन मुंबईच्या प्ले थेरेपिस्ट काजल यू दवे यांच्याशी बातचीत केली.

प्ले थेरेपीचे फायदे..

काजल यू दवे सांगतात की, प्ले थेरपी हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे मुले सुरक्षित वातावरणात आपल्या आवडी-निवडी इतरांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे शिकतात. ऑटिस्टिक मुले सहसा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू शकत नाहीत, तसेच कोणताही खेळ, किंवा इतर काहीतरी सतत करत राहतात. बरीच मुलं आपल्या कुटुंबातील लोक आणि भावंडांशी संवाद साधू शकत नाही आणि आपल्या गरजा त्याबद्दल त्यांना सांगू शकत नाही. प्ले थेरपी दरम्यान, थेरपिस्ट मुलांना असे वातावरण आणि माध्यम देण्याचा प्रयत्न करतात ज्याद्वारे ते आपल्या भावना इतरांपर्यंत व्यक्त करू शकतात आणि आपल्या गरजा इतरांना सांगू शकतात.

प्ले थेरेपीचे काही फायदे खालीलप्रमाणे -

  • या थेरपीद्वारे, ऑटिस्टिक मुले बोलणं, शब्द आणि सूचना समजून घेण्याचे तसेच काही प्रमाणात त्यांच्या वयाच्या इतर आणि सामान्य मुलांप्रमाणे वागणं शिकू शकतात.
  • या थेरपीच्या माध्यमातून ऑटिस्टिक मुलांमध्ये काही वेळ एकाच ठिकाणी बसण्याची क्षमता देखील विकसित होते. त्याचबरोबर, एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा करण्याची त्यांची सवय कमी होते. या व्यतिरिक्त, आपल्या गरजा कशा पूर्ण केल्या जाऊ शकतात, याबद्दल देखील ही बालके शिकतात.
  • या थेरपी दरम्यान ऑटिस्टिक मुले खेळणी, वाळू आणि इतर माध्यमांद्वारे त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकू शकतात.
  • या थेरेपीत मुलांना जास्त प्रयत्न करण्याची गरज नसते. कारण खेळ खेळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी इतरांशी बोलणे किंवा संवाद साधणे आवश्यक नसते.

प्ले थेरपी खूप प्रभावी आहे-

काजल यू दवे सांगतात की, इतर थेरपीच्या तुलनेत मुलांसाठी प्ले थेरपी आदर्श मानली जाते कारण त्यासाठी एकमेकांवर अवलंबून राहण्याची आणि संवाद साधण्याची गरज नसते. ऑटिस्टिक मुले लोकांशी संवाद साधण्यास सक्षम नसल्यामुळे, ही थेरेपी त्यांच्यासाठी खूप प्रभावी ठरते. ऑटिस्टिक मुलांच्या समस्या आणि क्षमता एकमेकांपेक्षा भिन्न असू शकतात, म्हणूनच या थेरेपी दरम्यान त्यांच्या भावना व्यक्त करण्यास शिकण्यास त्यांना थोडा वेळ लागू शकतो. म्हणजेच, या थेरेपीद्वारे मुलाच्या विकासाची गती त्यांच्या स्टेजनुसार वेगवेगळी असू शकते. त्यासाठी प्ले थेरेपीचा नियमितपणे सराव करणे आणि फॉलो अप सेशन नियमित करणे गरजेचे आहे. प्ले थेरेपीच्या वेळी, एकदा मूल वातावरणात मिसळलं की त्याच्यासोबत इतर मुलांना खेळण्यासाठी बोलावता येऊ शकतात. सहसा, या थेरेपीचे माध्यम संभाषण आणि शांतता दोन्ही असू शकते. हे पूर्णपणे मुलाच्या अवस्थेवर अवलंबून असते.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण davekajal26@gmail.com वर संपर्क साधू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.