ETV Bharat / sukhibhava

या हिवाळ्यात 'योग' करून ठेवा स्वत:ला उबदार - हिवाळ्यात योगाचे फायदे माहिती

हिवाळ्यात योग आणि व्यायाम तुम्हाला उबदार कसे ठेवतात ? आरोग्यासाठी कुठला योग करावा ? हिवाळ्यात काय खावे आणि कुठल्या अन्न पदार्थामुळे तुमचे शरीर थंडीतही उबदार राहते ? याविषयी ईटीव्ही 'सुखी भव्ं'चा विशेष लेख....

Yoga
योगा
author img

By

Published : Dec 15, 2020, 6:38 AM IST

हैदराबाद - हिवाळ्यामुळे आपण आळशी बनतो. पण, या ऋतूत नियमित योग केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. हिवाळ्यात हवा कोरडी राहते. त्याचा थेट परिणाम आपल्या चयापचय क्रियेवर होतो. योग आणि आयुर्वेद तुम्हाला या बदलत्या ऋतूशी जुळवून घेण्यास मदत करतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि व्यायाम यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. मुंबईच्या योग तज्ज्ञ निष्ठा बिजलानी यांनी 'थंडीशी कसा सामना करायचा'? याचे मार्गदर्शन केले आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करा. यामुळे तुम्हाला हिवाळ्यात होणारा अपचनाचा त्रास होणार नाही आणि तुमचे पोट एकदम स्वच्छ राहील.

खालील योग क्रियाही करायला हव्यात -

१) कपालभाती -

कपालभाती अग्नी श्वास म्हणूनही ओळखली जाते. यामुळे तुमच्या शरीरात अग्नी प्रज्वलीत होतो. कपालभातीमुळे पाचनक्रिया सुधारते आणि श्वसनाचे कार्य चांगले राहते. कपालभाती नियमित केल्याने फुफ्फुसे स्वच्छ राहतात, शरीरातले विषारी पदार्थ निघून जातात आणि सायनसही मोकळा होतो.

पद्धत -

मांडी घालून चटईवर बसा किंवा खुर्चीवर ताठ बसा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घ्या आणि मग एकामागोमाग श्वासाचे २० स्ट्रोक सोडा. हे करताना डोळे आणि तोंड बंद ठेवा. श्वास नाक आणि पोटातून बाहेर आला पाहिजे. श्वास सोडताना आवाज येईल. तुमच्या लक्षात येईल की श्वासाचे स्ट्रोक सोडताना पोट आत खेचले जाईल. चेहरा आणि शरीरावर ताण ठेवू नका.तुम्ही हळूहळू ५० स्ट्रोकपर्यंत वाढवू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही करू शकता. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कपालभाती करावी. गरोदर स्त्रिया, मासिक पाळीत आणि उच्च रक्तदाब असेल तर मात्र कपालभाती करू नका.

२) भस्त्रिका -

कपालभातीप्रमाणे भस्त्रिकाची श्वासोच्छवासाचीच क्रिया आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीरात तयार झालेले विषारी पदार्थ काढून टाकले जातात. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि तुम्हाला हलके, आरामदायी वाटू लागते.

पद्धत -

चटई किंवा खुर्चीवर आरामदायी स्थितीमध्ये बसा. श्वासाच्या लयीबरोबर तुम्ही तुमचे हात वर – खाली करा. श्वास आत घेताना हात वर आणि सोडताना हात खाली करा. श्वासोच्छवास आणि त्या लयीत हात वर – खाली करणे सतत करा. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी भस्त्रिका करावी. गरोदर स्त्रिया, मासिक पाळीत आणि उच्च रक्तदाब असेल तर मात्र अजिबात करू नका.

३) सूक्ष्म व्यायाम

तुमचे सांधे आखडू नयेत म्हणून या हळुवार हालचाली महत्त्वाच्या आहेत. विशेष करून थंडीत जेव्हा सांधे आखडतात, तेव्हा हे गरजेचे आहे. यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. सांध्यात साचून राहिलेली उर्जा यामुळे प्रवाहित होते. यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण होते, मन ताजे राहते आणि तुम्ही आनंदी राहता. यातील काही व्यायाम पाहा –

मानेचे व्यायाम - तुमची मान तुम्ही ४ दिशांना वळवा. वर, खाली, डावीकडे, उजवीकडे आणि मागे. पुन्हा मधोमध आणा.

मनगटाचे व्यायाम - घट्ट मूठ करा, हात तुमच्या खांद्याच्या रेषेत समोर आणा आणि मनगट वर्तुळाकार फिरवा.

पावले वाळवा - हे तुम्ही उभे राहून किंवा बसून आणि पायाला ताण देऊन करू शकता. पायाची बोटे वर खाली करा. पावलेही वर्तुळाकार फिरवा.

धनुरासन
धनुरासन

४) धनुरासन -

धनुरासन म्हणजे मागच्या बाजूला वाकणे. यात धनुष्यासारखी स्थिती असते. यात तुमच्या मज्जारज्जूला व्यायाम होतोच पण श्वसन आणि पचन क्रियाही चांगली राहते. यामुळे तुमचा मणका लवचिक होतो आणि मोकळा श्वास घेता येतो.

पद्धत -

चटईवर उपडे झोपा. गुडघे वाकवा आणि पाय बाहेरच्या बाजूने पकडा. पायावर जोर घेऊन तुमचा छातीकडला भाग उचला आणि छाती वर खेचा. एक लक्षात असू द्या की पाय पार्श्वभागापर्यंत आणू नका. ते वरच्या बाजूलाच पकडून ठेवा. ही क्रिया झाली की हळुवारपणे पाय सोडा आणि चटईवर विश्रांती घ्या. तुम्हाला पाठदुखी किंवा गुडघेदुखी असेल तर मात्र हे आसन करू नका.

गरम पदार्थांचे सेवन करा -

या मोसमात गरम सूप आणि अन्नाचे सेवन केले जाते. जड पदार्थांपेक्षा हलका आहार करा. हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते. म्हणूनच रात्री लवकर जेवा आणि दुपारी जड आहार घ्या. तेव्हा आकाशात सूर्य तळपत असतो. म्हणून पचन चांगले होते. थंड कोशिंबीर, गोठवलेले अन्न आणि कच्चे पदार्थ यापासून लांबच राहा. जेवणात मसाले, शेंगदाणे, तूप आणि मधाचा वापर करा. मोसम जसा बदलतो, तशी आपली जीवनशैलीही बदलावी लागते. हिवाळ्यात या छोट्या बदलांसह स्वत:ला उबदार ठेवा, आरोग्यदायी राहा आणि स्वत:ला सक्रिय ठेवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.