मोबाइल स्क्रिनची ब्ल्यू लाइट, जंक फूड आणि चुकीची जीवनशैली आपल्या शरीरासोबत त्वचेलाही प्रभावित करते, ज्यामुळे वयापूर्वीच त्वचा कोरडी आणि सुरकुती असलेली दिसून येते. असे जरी झाले तरी, त्वचेची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून अधिक नुकसान होऊ नये.
अँटी एजिंग उपचार सुरू करण्यासाठी कोणता वेळ योग्य?
कोरडी आणि निस्तेज त्वचा एजिंग स्किनची लक्षणे आहेत. प्रोफिलो, एक नवीन त्वचा जैव रिमॉडेलिंग प्रक्रिया, परिपक्व आणि वय वाढलेल्या त्वचेला जीवनाचा एक नवा आकार देण्याची एक उल्लेखनीय पद्धत आहे. प्रोफिलो एक ह्याल्यूरोनिक अॅसिड आधारित त्वचा पद्धती आहे, जी कोलेजन आणि इलास्टिन उत्पन्न करण्यासाठी त्वचेच्या क्षमतेला गॅल्व्हनाइज करण्यासाठी काम करते. याने त्वचेची चमक आणि लवचिकता वापस येते.
ह्याल्यूरोनिक अॅसिड हा त्वचेत नैसर्गिक आढळून येणारा एक हाइड्रोफिलिक पदार्थ आहे, ज्याची उपस्थिती त्वचेच्या बाह्य मॅट्रिक्सचे आरोग्य आणि आर्द्रता टिकवून ठेवण्याच्या क्षमतेसाठी गरजेचे आहे. जसजसे वय वाढते, तसतसे आपल्या त्वचेच्या ह्याल्यूरोनिक अॅसिडचे नैसर्गिक भंडार संपत जातात, ज्यामुळे त्वचा सैल होते आणि तिचा रंग आणि चमक देखील कमी होते.
इंटरनेटवर त्वचेसंबंधी अगणित माहिती उपलब्ध आहे. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, आपण वयाच्या 25 व्या वर्षापासून आपल्या त्वचेची काळजी घेणे सुरू केले पाहिजे, जेणेकरून पुढे आपल्याला सुरकुत्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तुम्ही आपल्या त्वचेची जेवढ्या लवकर काळजी घ्याल तेवढ्याच लवकर तुम्हाला त्याचे परिणामही दिसून येतील.
कसे असावे अँटी एजिंग स्किन केयर?
तुमचे सौंदर्य ध्येय लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या त्वचा तज्ज्ञ किंवा सौंदर्य तज्ज्ञासोबत एक योजना बनवली पाहिजे. त्वचा तज्ज्ञ आधी तुमच्या स्किनच्या समस्येचे विश्लेषण करतील आणि मग त्या आधारे तुम्हाला एक योजना सांगतील, जी तुमच्या स्किन टाइप, वय आणि खाण्या पिण्याच्या सवयींवर आधारित असेल.
उन्हापासून सुरक्षा
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून (u v rays) स्वत:चे रक्षण केले पाहिजे. 20 ते 30 च्या वयांत तीव्र उन तुमच्या त्वचेलाच नुकसान पोहोचवत नाही तर, दीर्घ काळापर्यंत त्याचा प्रभाव सुरकुत्याच्या रुपात तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. उन्हामुळे जेव्हा त्वचेचे नुकसान होते तेव्हा तातडीने त्वचा तज्ज्ञाला ते दाखवले पाहिजे. तो माइक्रोडर्माब्रेशन, केमिकल पील, लेजर थेरेपी आणि रेटिनॉइड्सच्या मदतीने तुमच्या त्वचेवर उपाचार करू शकतो.
टोपिकल क्रिम
तुमचे त्वचाशास्त्रज्ञ (dermatologist) तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारिक रेषा कमी करण्यासाठी कोणत्याही दुकानात उपलब्ध क्रिमचा सल्ला देऊ शकतात. अँटी एजिंग उत्पादनामध्ये रेटिनॉल, अल्फा अँड बिटा हाइड्रॉक्सी अॅसिड, विटामिन ए आणि सी देखील आढळतात, ते मृत पेशींना हटवण्यासाठी मदत करतात आणि त्वचेच्या पुनरुत्पादनाला प्रोत्साहन देतात. ज्यामुळे तुम्हाला निरोगी आणि मऊ त्वचा मिळू शकते.
लेझर ट्रिटमेंट
लेझर उपचार प्रत्यक्षात त्वचेच्या नव्या त्वचा पेशी आणि कोलेजनच्या नैसर्गिक उत्पादनाला प्रोत्साहित करते. त्याचबरोबर, या उपचारानंतर डाग, हाइपरपिग्मेंटेशन आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. तुमचे स्किनकेअर तज्ज्ञ तुम्हाला तुमचा सर्वोत्तम संभाव्य परिणाम मिळवण्यासाठी किती उपचारांची आवश्यक्ता आहे? याबाबत मार्गदर्शन करण्यास सक्षम असेल.
डर्मल फिलर्स
वय आणि कोलेजनच्या कमतरतेमुळे चेहऱ्याचा आकार कमी होतो. चेहऱ्याच्या त्वचेला भरण्यासाठी डर्मल फिलर्सला उपयोगात आणले जाते. त्वचा तज्ज्ञ सुरकुत्यांना भरण्यासाठी, ज्या ठिकाणी ते अधिक आढळतात, तोंडाभोवती आणि डोळ्यांखाली डर्मल फिलर्सचा वापर करेल. ते गालांना भरण्यास मदत करते. डर्मल फिलर्स सामान्यत: सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत राहाते.
माइक्रोडर्माब्रेशन
सुरकुत्यांसाठी ही प्रक्रिया आणखी एक प्रभावी उपचार असू शकते, जी मेलास्मा, एज स्पॉट आणि उनापासून होणाऱ्या नुकसानीवरही (sun damage) उपचार करू शकते. तुमचा स्किनकेयर तज्ज्ञ तुमच्या त्वचेवर एका रासायनिक पदार्थाच्या बारीक कणांना स्प्रे करण्यासाठी एका उपकरणाचा वापर करेल. ते त्वचेला पुन्हा निर्माण करण्यास सक्षम करेल, ज्याने वय वाढल्याच्या काही लक्षणांचे प्रमाण कमी होऊ शकते.
हेही वाचा - बहुतांश स्त्रिया अंतर्वस्त्राच्या 'या' प्रकारांपासून अनभिज्ञ