ETV Bharat / sukhibhava

ऑलिव्ह ऑईलचा उपयोग आरोग्यासाठी चांगला की हानिकारक? पोषण तज्ज्ञ सांगतात.. - ऑलिव्ह ऑईल माहिती सुखीभव

देशात असो किंवा विदेशात ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी आदर्श मानले जाते. ऑलिव्ह ऑईलचा वापर केवळ अन्नामध्येच होत नाही तर, त्याचा बाह्य वापर आपल्या त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 24, 2021, 6:44 PM IST

ऑलिव्ह ऑईलचा उपयोग लोक खाण्याव्यतिरिक्त सौंदर्य प्रसाधने, औषध, साबन आणि पारंपारिक दिव्यांसाठी इंधन म्हणून करतात. परंतु, अन्नामध्ये त्याच्या वापर आरोग्याला असणाऱ्या अनेक रोगांचा धोका कमी करतो. त्यामुळे बहुतांश डॉक्टर अन्नात त्याचा उपयोग करण्याचा सल्ला देतात.

पोषण तज्ज्ञ डॉ. संगिता मालू सांगतात की, ऑलिव्ह ऑईल हे जीवनसत्व (vitamin), मिनरल, अँटिऑक्सिडेंट आणि इतर अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याचबरोबर, यात प्रमुख फॅट मोनोअनसॅच्यूरेटेड फॅटी अ‍ॅसिड (MUFA) आढळते जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. त्यामुळे, अन्नामध्ये त्याचा वापर न केवळ अनेक प्रकारच्या रोगांचा धोका कमी करते तर, अन्नाचे पोषण देखील वाढवते.

आरोग्यासाठी लाभदायक

ऑलिव्ह ऑईलसंबंधी करण्यात आलेले विविध अभ्यास या बाबीची पुष्टी देतात की, ते आपल्या आरोग्यासाठी आदर्श असू शकते. खरे तर, एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडेंट समृद्ध प्रमाणात आढळतात, जे मुक्त कणांमुळे होणाऱ्या सेल्युलर हाणीला टाळण्यास मदत करतात. हे मुक्त कण केवळ ऑक्सिडेटिव्ह तणावच निर्माण करत नाहीत तर, ते पेशींना हानी आणि कॅन्सरसह अन्य काही आजारांचा धोका वाढवण्याचेही कार्य करतात.

शरीराच्या विविध भागांसाठी ऑलिव्ह ऑईलच्या फायद्यांवर करण्यात आलेल्या काही संशोधनांचा तपशील पुढील प्रमाणे आहे :

ऑलिव्ह ऑईल आणि हृदय प्रणाली

वर्ष 2018 मधील एका अभ्यासातून असे पुढे आले की, जी लोक भूमध्यसागरीय आहार घेतात ज्यात ऑलिव्ह ऑईलचा वापर अधिक केला जातो त्यांच्यात हृदय रोग कमी दिसून येतो. तसेच, 2018 मधील एका पुनरावलोकनात लेखकांनी अन्न आणि औषधी प्रशासन (FDA) आणि युरोपीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या या सूचनेची पुष्टी केली आहे की, हृदयसंबंधी धोका कमी करण्यासाठी दरदिवशी जवळजवळ 20 ग्राम किंवा दोन मोठे चम्मच एक्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईलचे सेवन फायदेशीर असते.

2017 मधील एका अभ्यासाच्या परिणामांनी देखील या बाबीची पुष्टी केली होती की, एक्सट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल्स (polyphenols) हृदय रोग, एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis), स्ट्रोक, मेंदूची शिथिलता आणि कॅन्सरपासून सुरक्षा प्रदान करू शकतात.

चयापचय सिंड्रोम (Metabolic Syndrome)

2019 च्या मेटा - विश्लेषणाच्या लेखकांनी निष्कर्ष काढला होता की, ऑलिव्ह ऑइल सूज, रक्तातील साखर, ट्राइग्लिसराइड्स (रक्तातील फॅट) आणि कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलोस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे, चयापचय सिंड्रोमची लक्षणे सुधारतात. या व्यतिरिक्त ते उच्च घनतेचे लिपोप्रोटीन (HDL) किंवा चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते.

नैराश्याचे जोखीम आणि ऑलिव्ह ऑईल

2013 मध्ये एका अभ्यासाने सुचवले होते की, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर मज्जासंस्थेचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते आणि निराशा आणि चिंतेच्या उपचारासाठी उपयोगी ठरू शकते.

ऑलिव्ह ऑइल आणि कर्करोगाचा धोका

2019 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑइलमध्ये असे पदार्थ असतात जे कोलोरेक्टल कॅन्सरला (colorectal cancer) रोखण्यास मदत करू शकतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या बाबीचे पुरावे मिळाले आहेत की, ऑलिव्ह ऑइलमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट शरीराला सूज, ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि एपिजेनेटिक बदलांपासून वाचवण्यासाठी मदत करू शकतात.

अल्झायमर रोग

2016 मध्ये काही शास्त्रज्ञांनी एका अभ्यासत असे सुचवले होते की, आहारात एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने अल्झायमर रोगाला रोखण्यात मदत मिळू शकते. कारण ते मेंदूतील रक्तवाहिन्यांवर संरक्षणात्मक प्रभाव दर्शवते.

2019 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाच्या लेखकांनी असे सुचवले की, ऑलियोकॅन्थलने समृद्ध एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचे सेवन अल्झायमरच्या प्रगतीला मंद करणे किंवा त्यास रोखण्यात मदत करू शकते. ऑलियोकॅन्थल हे फिनोलिक संयुग (compound) आहे.

ऑलिव्ह ऑइल आणि यकृत (liver)

प्रयोगशाळा अभ्यासाच्या 2018 च्या पुनरावलोकनात असे आढळले की, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यकृताचे नुकसान टाळण्यास किंवा दुरुस्त करण्यास मदत करू शकते. या तेलात एमयूएफए (MUFA) आढळतात जे प्रामुख्याने ओलिक अ‍ॅसिड असतात आणि त्याचे फिनोलिक यौगिक सूज, ऑक्सिडेटिव्ह ताण, इन्सुलिन प्रतिकार आणि अन्य बदलांना रोखण्यास मदत करतात.

ऑलिव्ह ऑइल आणि आतडी रोग

2019 च्या पुनरावलोकनात असे आढळून आले की, ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे फिनोल आतड्यांमधील सूक्ष्मजंतू बदलून आतड्यांची प्रतिकारशक्ती आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. ते कोलाइडिस आणि इतर प्रकारचे आयबीडी असलेल्या लोकांसाठी उपयुक्त असू शकते. परंतु, या पुनरावलोकनाचे लेखक या क्षेत्रात अधिक अभ्यास करण्याच्या आवश्यक्तेवर भर देतात.

पोषण

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरनुसार (USDA) 1 मोठा चम्मच किंवा 13.5 ग्राम ऑलिव्ह ऑइलमध्ये पोषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे,

- 119 कॅलरी

- 13.5 ग्राम वसा (fat) (ज्यात 1.86 ग्राम संतृप्त आहे)

- 1.9 मिलीग्राम विटामिन ई

- 8.13 माइक्रोग्राम विटामिन के

या व्यतिरिक्त त्यात कॅल्शिमय, पोटाशियम, पॉलिफेनोल्स, टोकोफेरोल, फाइटोस्टेरॉल, स्क्वालीन, टेरपेनिक अ‍ॅसिड आणि अन्य अँटिऑक्सिडेंट आढळतात.

कोणते ऑलिव्ह ऑइल चांगले?

बाजारात ऑलिव्ह ऑइलचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, मात्र खाण्यासाठी अतिरिक्त व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल सर्वोत्तम मानले जाते, कारण ते कमी प्रक्रियेतून जाते, ज्यामुळे त्याची अँटिऑक्सिडेंट सामग्री राखली जाण्याची अधिक शक्यता असते. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये 376 °F (191 °C) चा उच्च स्मोक पॉइंट असतो, त्यामुळे बहुतांश स्वयंपाक पद्धतींसाठी त्याच्या उपयोग करणे सुरक्षित असते.

तळण्यासाठी देखील ऑलिव्ह ऑइल चांगले

ऑलिव्ह ऑइल काहीही तळण्यासाठी योग्य नाही, असा गैरसमज सामान्यत: लोकांमध्ये असतो, मात्र 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुनरावलोकनानुसार, ऑलिव्ह ऑइलमध्ये अन्न तळल्यास त्याचे पोषण मुल्य टिकवून ठेवण्यात आणि सुधार करण्यात मदत मिळू शकते. अन्न अँटिऑक्सिडेंट घेते जे तेलातून हस्तांतरित होते आणि ते पुरेशा प्रमाणात ऑलिव्ह ऑइलमध्ये मिळते, हे यामागचे कारण आहे.

हेही वाचा - केस सुंदर, निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा 'हे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.