आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण बऱ्याच आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो, जसे आपले आरोग्य आणि आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणे, ज्यामुळे आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या परस्पर संबंधांवरही परिणाम होऊ लागतो. या दोन्ही बाबींपासून बचाव करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक असा मार्ग सांगणार आहोत ज्याने केवळ आरोग्यच नव्हे तर, तुमच्या नात्यातील जवळीकता आणि रोमांस, सर्वच चांगले होईल. ते मार्ग म्हणजे, एकत्र योग किंवा व्यायाम करणे.
हेही वाचा - कॅफिनचे आवश्यक्ते पेक्षा अधिक सेवन 'या' घातक आजाराला देऊ शकते आमंत्रण
विशेषत: योगाबद्दल बोलायचे झाले तर, अशी अनेक आसने आहेत ज्यांचा एकत्र अभ्यास केल्याने न केवळ जोडीदार एकमेकांशी प्रेम आणि जवळीकता अनुभवू शकतात तर, या आसनांनी कामवासना ( libido ) आणि स्टॅमिना हे दोन्ही सुधारतात.
कपल योगाचे ( Couple yoga ) फायदे
जेव्हा एखादे जोडपे एकत्र काही योग अभ्यास करते तेव्हा त्यांच्या नात्यामध्ये जवळीकता ( Intimacy ) वाढतेच. शिवाय विश्वास, संवाद आणि आनंदी वातावरण देखील निर्माण होते. कपल योगाचे ( Couple yoga ) काही फायदे पुढील प्रमाणे आहेत.
- परस्पर विश्वास, शारीरिक आणि भावनिक संबंध निर्माण करतो.
- आपल्या जोडीदाराबरोबर योगाभ्यास करणे जवळीकता निर्माण करण्यात मदत करू शकते.
- कपल योगा मजेची भावना उत्पन्न करते आणि तुम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी देते.
- अनेकदा जोडीदारांना सामाजिक आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांबरोबर अधिक वेळ घालवता येत नाही. अशात कपल योग त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायची संधी देते.
लोकप्रिय आणि सोपे 'कपल योग आसन'
पार्टनर ब्रीदिंग (सामान्य श्वास अभ्यास)
- या अभ्यासासाठी कपल्सनी एकमेकांच्या पाठीला पाठ टेकवून पद्मासनमध्ये बसावे.
- या नंतर श्वासावर लक्ष केंद्रित करून हळू हळू दीर्घ श्वास घ्यावे आणि सोडावे.
- लक्षात ठेवा संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही जोडीदारांची पाठ एकमेकांना टेकून असायला हवी. ज्यामुळे त्यांना आपल्या जोडीदाराची श्वास घेणे आणि सोडण्याची प्रक्रिया पाठीच्या माध्यामातून अनुभवता येईल.
- या आसनाला 3 ते 5 मिनिटांपर्यंत करा.
हा योग तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी जोडतो आणि त्याला अधिक चांगल्या प्रकारे जवळ करण्यास मदत करतो.
नौकासन ( Navasana )
- नौकासनाच्या ( Navasana ) अभ्यासादरम्यान शरीर नावासारख्या आकृतीत येते. या आसनाचे अनेक प्रकार असू शकतात, जसे परिपूर्ण नावासन, अर्ध नावासन, एकपद नावासन इत्यादी. नौकासनाच्या आभ्यासादरम्यान पायांची आणि हातांची स्ट्रेचिंग एकाचवेळी होते.
- एकत्र नौकासन करण्यासाठी कपल्सने एकमेकांसमोर तोंड करून बसावे.
- दोघांमध्ये जवळजवळ तीन फूट एवढे अंतर असावे.
- आपल्या पायांबाहेरून हातांना काढून एकमेकांचे हात धरा.
- आता दोघेही आपली पाये उचला आणि एकमेकांच्या पायांच्या तळव्याला जोडा. शरीराचा तोल राखून ठेवून आपल्या पायांना स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा.
पश्चिमोत्तानासन/मत्स्यासन
पश्चिमोत्तानासन किंवा मत्स्यासन पाय आणि पाठ ताणण्यासाठी सर्वोत्तम आसन आहे. ही मुद्रा थोडी आव्हानात्मक देखील असू शकते. विशेषकरून जेव्हा एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा अधिक लवचिक असेल. हे आसन मंद गतीने केले पाहिजे, अन्यथा तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदारास दुखापत होऊ शकते.
- एकत्रित पश्चिमोत्तानासन करण्यासाठी आपल्या जोडीदाराबरोबर पाठ टेकवून बसा.
- आपल्या जडीदाराला आपली पाये पसरायला सांगा आणि पुढे झुकण्यास सुरुवात करा.
- या दरम्यान दुसरा जोडीदार दोन्ही पायांना जमिनीवर सपाट ठेवून आपल्या पार्टनरच्या पाठीकडे झुकायला सुरुवात करतो. म्हणजेच, या प्रक्रियेत एका पार्टनरचा चेहरा जमिनीच्या दिशेने असतो तर, दुसऱ्या पार्टनरचा चेहरा आकाशाच्या दिशेने असतो.
- असे पाच ते सहा वेळा दीर्घ श्वास घेऊन करा आणि ही प्रक्रिया आळीपाळीने करा.
अधोमुख श्वानासन/बालासन
हा फूल - बॉडी स्ट्रेच आसन आहे.
- या आसनात सर्वप्रथम आपले गुडघे वाकवून समोरच्या दिशेने हात पसरवून बालासनच्या मुद्रेत बसा.
- आता दुसऱ्या जोडीदाराने समोर उभे राहावे.
- आता बालासन करणाऱ्या जोडीदाराने समोर उभे असलेल्या जोडीदाराच्या पायाच्या घोट्या धरावे आणि उभे असलेल्या जोडीदाराने समोर झुकत आपल्या पार्टनरला त्याच्या कमरेजवळ पकडावे.
- तुम्ही तुमच्या पार्टनरच्या पाठीच्या कण्याला स्पर्श करणार नाही आणि त्यावर ताण आणणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवावे.
- या मुद्रेत पाच ते सहा दीर्घ श्वास घ्या.
पार्टनर ट्विस्ट
- या आसनाला करण्यासाठी एकमेकांनी पाठीला पाठ टेकवून ध्यान मुद्रेत बसावे.
- या नंतर दोन्ही जोडीदारांनी दीर्घ श्वास घेत आपापल्या उजव्या दिशेला शरीराला ट्विस्ट करत आपला सरळ हाथ आपल्या जोडीदाराच्या घुटण्यावर किंवा मांडीवर ठेवा.
- आता श्वास सोडून जुन्या स्थितीत परत यावे.
- आता हीच प्रक्रिया दुसऱ्या हाताने दुसऱ्या दिशेने करा.
- नियमितरित्या हा आसन केल्याने तुमच्या शरीरात रोमांस वाढेल.
टेम्पल पोझ
या आसनात दोघांना त्यांच्या हातांनी मंदिर सारखी आकृती बनवायची असते.
- या आसनाला करण्यासाठी जोडीदार एकमेकांसमोर उभे राहावे.
- आता दोन्ही जोडीदार दीर्घ श्वास घेत कमरेच्या वरील भागास समोरच्या दिशेने झुकवत आपले हात वर करतील आणि आपल्या जोडीदाराच्या हातांना स्पर्श करतील.
- लक्षात ठेवा की, तुमचे तळहात तुमच्या जोडीदाराच्या तळहातांना टेकलेले असावे आणि कोपरापर्यंत हातांचा स्पर्श असावा.
- या मुद्रेत दोघेही जोडीदार मिळून मंदिर सारखी आकृती बनवतील.
- या अवस्थेत काही वेळ उभे राहा नंतर सामान्य मुद्रेत या.
- या आसनाला 5 ते 6 वेळा करा.
पार्टनरबरोबर हा आसन केल्याने नाते बळकट होण्याबरोबरच विश्वास देखील वाढेल.
हेही वाचा - अल्झायमरपासून सावधान..! या आजाराने स्मरणशक्ती कमी होऊ शकते, तो 'या' कारणांनी होतो