ETV Bharat / sukhibhava

जाणून घ्या काय आहे आयुर्वेदात स्तनपानाचे महत्त्व - breastfeeding

'शरीराचे सात घटक आहेत. त्यांना धातू म्हणतात. आईचे दूध हे रस धातूपासून घेतले आहे आणि त्यातलाच एक घटक आहे. आईने घेतलेला आरोग्यदायी आहार आणि चांगली पचनशक्ती यामुळे सकस दूध तयार होते, 'डाॅ. श्रीकांत सांगतात. इतके फायदे असलेले स्तनपान हे पृथ्वीवरच्या प्रत्येक जिवासाठी अत्यावश्यक आहे. बाळ इतर पदार्थ खाऊ शकेल, अशा वयात पोहोचेपर्यंत हे दूध अतिशय आरोग्यवर्धक आणि पोषक आहे.

Importance Of Breastfeeding In Ayurveda
आयुर्वेदात स्तनपानाचे महत्त्व
author img

By

Published : Aug 7, 2020, 12:06 PM IST

प्रसूतीनंतर स्तनपान हे आई आणि मुलासाठी वरदान आहे. यामुळे बाळाची वाढ होते, रोगांची लढण्यासाठी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि स्तनपानामुळे आई-बाळाचे नाते आणखी घट्ट होते. आयुर्वेदातही स्तनपानामुळे बाळांना होणारे फायदे आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे. बीआरकेआर सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य बीएएमएस, एमडी असलेले डाॅ. श्रीकांतबाबू पेरुगू सांगतात, अगदी सुरुवातीपासून स्तनपान आवश्यक असल्याचे आयुर्वेद सांगते. शक्यतो बाळाला जन्म देणारी आईच स्तनपान देते. पण समजा आई ठराविक कारणाने आजारी असेल तर दुसरी स्त्री स्तनपान देऊ शकते आणि तिला धात्री असे म्हणतात.

गुणधर्म ( स्तन्यसंपत )

बाळासाठी स्तनपान हे खूप महत्त्वाचे आहे. जन्मानंतर कमीत कमी ६ महिने तरी ते आवश्यक आहे. बाळ स्तनपानापासून वंचित राहता कामा नये. डाॅ. श्रीकांतबाबू कुठले आईचे दूध योग्य ते खालीलप्रमाणे सांगतात –

  • त्याचा रंग सर्वसाधारण हवा
  • नैसर्गिक सुवास हवा.
  • सर्वसाधारण सातत्य हवे.
  • बाळासाठी थोडे गोड आणि स्वादिष्ट हवे.
  • दूध एक कप पाण्यात मिसळले तर सहज आणि पूर्णपणे विरघळले गेले पाहिजे.

दुधाच्या या गुणधर्मामुळे बाळाचे योग्य पोषण आणि वाढ होते.

संबंधित गोष्टी ( स्तन लक्षण )

आयुर्वेदात आईच्या दुधासंबंधी २ गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर भरपूर दूध आणि दुसरे अपुरे दूध.

  1. स्तन्य वृद्धी लक्षण

यात आईचे दूध जास्त असते. या परिस्थितीत दूध सारखे येते आणि स्तनाचा आकार पूर्ण दुधाने भरलेला असतो.

  1. स्तन क्षय लक्षण

यात आईचे दूध अपुरे असते. अशा वेळी स्तनात दुधाचा स्राव कमी आणि वायू जास्त असतो. एकूणच स्तनात दूध निर्मिती कमी होते.

फायदे ( स्तन गुणकर्म )

आयुर्वेदात स्तनपानाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे :

  1. हे दूध बाळाला जीवन देते.
  2. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि बाळाचे अनेक आजारांपासून संरक्षण करते.
  3. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.
  4. बाळाच्या शरीरातल्या पेशींची वाढ होते.
  5. हे दूध चवीला गोड, हलके आणि शीतल आहे.
  6. हे दूध जीवनदायी आहे.

'शरीराचे सात घटक आहेत. त्यांना धातू म्हणतात. आईचे दूध हे रस धातूपासून घेतले आहे आणि त्यातलाच एक घटक आहे. आईने घेतलेला आरोग्यदायी आहार आणि चांगली पचनशक्ती यामुळे सकस दूध तयार होते, 'डाॅ. श्रीकांत सांगतात. इतके फायदे असलेले स्तनपान हे पृथ्वीवरच्या प्रत्येक जिवासाठी अत्यावश्यक आहे. बाळ इतर पदार्थ खाऊ शकेल अशा वयात पोचेपर्यंत हे दूध अतिशय आरोग्यवर्धक आणि पोषक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.