हैदराबाद : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात तर मुलांच्या अभ्यासावर खूप परिणाम झाला आहे. बऱ्याच कारणांमुळ त्यांचे मन अभ्यासातून भरकटते. करिअरबाबत स्पर्धेचे वातावरण असल्याने प्रत्येक मुलाला चांगले गुण मिळवण्याचे आव्हान आणखी वाढले आहे. त्यामुळे ते नेहमी (If your kids are not interested in studies) तणावाखाली असतात.
खोलीमध्ये देवी सरस्वतीचा फोटो अवश्य लावला पाहिजे : वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाची आवड पुन्हा जागृत करण्यासाठी अभ्यासाची खोलीमध्ये देवी सरस्वतीचा (Devi Sarasvati Photo) फोटो अवश्य लावला पाहिजे. मुलांच्या खोलीत जर तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तो ईशान्य दिशेला ठेवा. अभ्यासाच्या टेबलावर माता सरस्वतीचे फोटो ठेवता येईल. अभ्यासाच्या खोलीमध्ये भिंतींवर दक्षिण दिशेला कलात्मक (try these remedies) फोटो लावा.
स्टेशनरीशी संबंधित लहान रॅक बनवू शकता : उत्तर दिशेने मुलांसाठी स्टेशनरीशी संबंधित लहान रॅक बनवू शकता. मुलांची पुस्तके (Books) व्यवस्थित एका कपाटात किंवा ड्राॅवरमध्ये सेट करून ठेवा.
जास्त पुस्तके पाहून मुलांना तणाव येऊ शकतो : तसेच, वाचनाच्या ठिकाणी जास्त पुस्तके ठेवू नयेत हे लक्षात ठेवा. पुस्तके वेगळ्या कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ठेवा. कारण जास्त पुस्तके ठेवल्याने मुलांना ओझे वाटू लागते आणि त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही. बऱ्याचदा जास्त पुस्तके पाहून मुलांना तणाव येऊ शकतो.
काळा किंवा गडद रंग वापरणे टाळा : ज्योतिष शास्त्रानुसार, स्टडी रूम सजवताना भिंतींचा रंग लक्षात ठेवा. असे केल्याने मुलांमधील सर्जनशीलता वाढते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होते. त्यामुळे खोलीतील रंग उजळ ठेवा. तुम्ही खोलीला पांढरा शुभ्र, फिकट निळा, फिकट गुलाबी अशाप्रकारचे रंग वापरू शकता. काळा किंवा गडद रंग वापरणे टाळा. असे केल्याने मुलांमध्ये तणाव वाढू शकतो.
वाचन कक्ष पायऱ्यांखाली नसावा : मुलांच्या शिक्षणासाठी आणि उत्तम निकालासाठी, अभ्यास करण्याऐवजी दिशेकडे लक्ष द्या. अभ्यासासाठी पूर्व आणि उत्तर दिशा उत्तम मानली जातात. म्हणूनच या दिशेने अभ्यासाचे टेबल आणि खुर्ची ठेवा. तसेच, वाचन कक्ष पायऱ्यांखाली नसावा हे लक्षात ठेवा.
यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते : लक्षात ठेवा अभ्यासाच्या खोलीत भिंतींवर भितीदायक किंवा हिंसक चित्रे लावू नका. यामुळे मुलांच्या अभ्यासात अडथळा तर निर्माण होतोच, पण घरात तणाव निर्माण होतो. मुलांच्या खोलीत त्यांना आवडणारे चित्रे देखील लावले पाहीजे. अभ्यासाच्या खोलीत रंगीत चित्रे किंवा कल्पनांनी भरलेली चित्रे वापरा. असे केल्याने मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते.