ETV Bharat / sukhibhava

Republic Day : या प्रजासत्ताक दिनी तुम्हाला फॅशनेबल दिसायचे असेल तर फाॅलो करा 'या' टिप्स - प्रजासत्ताक दिन

प्रत्येकाला प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) देशभक्तीच्या रंगात रंगून जायचे असते. प्रजासत्ताक दिनी सर्वांना सुट्टी असते. अशावेळेस आपण बाहेर जाण्याचा बेत आखतो. या प्रजासत्ताक दिनी तुम्हाला (look fashionable on this Republic Day) फॅशनेबल दिसायचे असेल तर या फॅशन आणि ब्युटी टिप्स (follow fashion and beauty tips) फाॅलो करा.

Republic Day 2023
प्रजासत्ताक दिन
author img

By

Published : Jan 8, 2023, 4:14 PM IST

Updated : Jan 25, 2023, 7:01 PM IST

हैदराबाद : 26 जानेवारी हा दरवर्षी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) म्हणून साजरा केला जातो. तसे, या दिवशी सर्वांना सुट्टी असते. पण अनेक लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांच्या शाळेत, काॅलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी अशा इत्यादी ठिकाणी जातात. अनेकजण या दिवशी बाहेर फिरण्याचाही बेत आखतात. यादरम्यान कपड्यांपासून ते अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत देशभक्तीची झलक सहज पाहायला मिळते. आजकाल बाजारात तिरंग्याच्या रंगाचे ड्रेस, बांगड्या, नेकलेस, हेअर कलर, कानातले, टिकली आणि इतर गोष्टी विकल्या जात आहेत. या गोष्टींमध्ये भगवा, पांढरा आणि हिरवा या तिन्ही रंगांचे मिश्रण असतात. 26 जानेवारीला या गोष्टी परिधान तुम्ही सहज देशभक्तीची भावना (feeling of patriotism) दाखवू शकता.

1. बांगड्या : जर तुमच्याकडे तिरंग्याच्या रंगाचा ड्रेस उपलब्ध नसेल तर तुम्ही तिरंग्याच्या रंगातील बांगड्याचा सेट घालू शकता. बांगड्या घालताना बांगड्याचे तीन सेट तयार करून घ्या. भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या वापरून ट्रायो बनवू शकता. हिरव्या, भगव्या आणि पांढऱ्या बांगड्या एकत्र करून एका हातावर किंवा दोन्ही हातावर घाला, त्या खूप आकर्षक (look fashionable on this Republic Day) दिसतील. 2. कानातले : हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कानातले मिळतात. धाग्यांनी बनवलेल्या तिरंग्याच्या कानातल्यांचीही या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विक्री होते. हे झुमके घालून तुम्ही प्रजासत्ताक दिनाप्रमाणे तुमचा लूक बनवू शकता.

3. पोशाख : प्रजासत्ताक दिनी तुम्ही तिरंग्याच्या रंगाचा पोशाख परिधान करू शकता. तुम्ही ओढणी, लेगीन्स आणि कुर्ता अशाप्रकारे काॅम्बीनेशन करू शकता. तसेच तुम्ही साडी किंवा सुट देखील घालू शकता. 4. डोळ्याचा मेकअप : डोळ्यांचा मेकअप करून तुम्ही तिरंगा लुक देखील करू शकता. आयशॅडो वापरून तुम्ही पूर्णपणे वेगळे दिसू शकता. यासाठी सिल्व्हर आयशॅडोने आतील डोळा झाकून घ्या, नंतर वरच्या बाजूला ऑरेंज आयशॅडो आणि खाली हिरवी काजल पेन्सिल लावा. भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा लेयर तुम्ही डोळ्यावर लावू शकता. 5. टिकली : तुम्ही छोट्याछोट्या तीन टिकल्यांचा वापर करू शकता. याशिवाय कपाळावर तिरंग्याची बिंदी वापरता येते.

6. केसांमध्ये तिरंग्याची झलक : तुम्ही तुमच्या केसांमध्ये तिरंग्याची झलकही दाखवू शकता. यासाठी, प्रथम तुम्हाला हवी असलेली हेअरस्टाईल बनवा. यानंतर केसांवर वरून हिरव्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाची आयशॅडो पुढच्या बाजूने लावा किंवा तुम्ही नैसर्गिक रंग देखील वापरू शकता. 7. तिरंग्याचे स्टिकर्स : तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर तुम्ही तिरंग्याचे वेगवेगळे स्टिकर्स तुमच्या कपड्यांवर लावू शकता.

Last Updated : Jan 25, 2023, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.