ETV Bharat / sukhibhava

Holiday Destinations : जर तुम्ही मुलांसोबत सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर 'या' ठिकाणांना भेट द्या - planning to go on vacation with kids

डिसेंबर महिना भेट देण्यासाठी योग्य आहे. या महिन्यात लाँग वीकेंड येतो. ख्रिसमससोबतच नवीन वर्षाचीही सुट्टी असते. यासाठी लोक डिसेंबर महिन्यात जाण्याचा विचार करतात. लोकही मुलांसोबत फिरायला जातात. तुम्हीही मुलांसोबत सुट्टीत जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. जाणून घेऊ या ठिकाणांबद्दल. (Holiday Destinations in India)

Holiday Destinations
सुट्टीची ठिकाणे
author img

By

Published : Dec 20, 2022, 3:48 PM IST

1. चेन्नई (Chennai) : जर तुम्ही हिवाळ्याच्या हंगामात कौटुंबिक सुट्टीवर जात असाल तर समुद्रकिनारी असलेल्या शहरांना भेट द्या. या हंगामात उत्तर भारतातील भागात कडाक्याची थंडी असते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत चेन्नईला जाऊ शकता. तुम्ही तुमची सुट्टी चेन्नईमध्ये तुमच्या कुटुंबासोबत घालवू शकता. चेन्नईमध्ये अनेक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. यापैकी पार्थसारथीचे मंदिर, संग्रहालय आणि प्राणीसंग्रहालय ही मुलांसाठी योग्य ठिकाणे आहेत. (Holiday Destinations in India )

2. महाबळेश्वर (Mahabaleshwar) : महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. तुम्ही तुमचा विकेंड साजरा करायला मित्र परिवार, पार्टनर किंवा फॅमिलीसोबत जाऊ शकता. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून 1362 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.

3. लोणावळा (Lonavala) : लोणावळा हे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने 64 किमी अंतरावर आहे. लोणावळ्याची चिक्की ही सुप्रसिद्ध आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. विपुल वनराई, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, हिरवीगार निसर्गशोभा, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही मनाला अत्यंत सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तुम्ही इथे तुमच्या पार्टनरसोबत देखील जाऊ शकता.

4. दार्जिलिंग (Darjeeling) : मुलांना टॉय ट्रेनमध्ये घेऊन जायचे असेल तर दार्जिलिंगला जा. हे सुंदर हिल स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. दार्जिलिंगमध्ये चहाची बाग आहे. दार्जिलिंग हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळेल. नैसर्गिक सौंदर्यासाठी दार्जिलिंग जगभर प्रसिद्ध आहे. याशिवाय तुम्ही मुलांसोबत जिम कॉर्बेटलाही भेट देऊ शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.